राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..
मा.जिल्हाधिकारी यांचा आदेशान्वये मेलघाटातिल दुर्गम क्षेत्रात विशेष अभियान कार्यक्रम चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर पर्यंत घेण्यात येत आहे.नवनियुक्त चिखलदरा तहसील चे तहसीलदार श्री.शारंग ढोमसे सर यांचा मार्गदर्शन नुसार चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा येथे ०४/०९/२३ ला तर ०५/०९/२३ गौलखेड़ा बाजार,०६/०९/२३/सलोना,०७/०९/२३ भांडुम(ढाकना) ०८/०९/२३ काजलडोह ला तर ११/०९/२३ ला भांडुम येथे थेट कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा माध्यमातून तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील आदिवासी लोकांना व अन्य लोकांना एकाच छताखाली नवीन मतदान नोंदनी,जात प्रमाणपत्र ,नवीन शिधा पत्रिका,दुय्यम शिधा पत्रिका,त्याच प्रमाणे संजय गांधी यो.,इंदिरा गांधी यो.,विधवा,श्रावनबाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य या सर्व योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. या शिबिरात तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक,आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी,हे सर्व शाशकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे.तिथेच लाभार्थ्याचे व अर्जदाराचे कागदपत्राचे तपासनी करुन संजय गांधी,इंदिरा गांधी,श्रावणबाळ ,वृद्धपकाळ ,अश्या सर्व महत्वाच्या योजनेचे फॉर्म भरण्यात येईल. जे उम्मेदवार १८ वर्षाचे झाले असतील त्यांचे मतदान कार्डकरीता फॉर्म स्वीकारण्यात येईल. अर्जाची पड़ताळणी करून त्यांचे प्रस्ताव संबंधित सेतू संचालकांना ऑनलाइन करून घेण्याकरिता लगेच देण्यात येईल.कैंपमध्ये सदहु कामाकरिता आशीष तालेवार निवासी नायब तहसीलदार,एस.एस.सोळंके सर नायब तहसीलदार महसूल,जी.ई.राजगड़े सर (संगायो) यांचा अधीपत्याखाली संपूर्ण शिबिराचे नियोजन होणार आहे .संबंधित गाव मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी,वनपरीक्षेत्र अधिकारी,ग्रामसेवक,सेतू संचालक, ग्रामपंचायत कर्मचारी,मुख्यध्यापक,,स्वस्त धान्य दुकानदार,नायब तहसीलदार,महसूल सहायक,इत्यादि सर्व अधिकारी ,कर्मचारी सर्व उपस्थित राहणार आहे. शिबिरात शक्य तेवढ्या लवकर अर्जाला निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल .क्षेत्रातील सर्व गरजू लाभार्थी यांनी या संधीचा लाभ घ्यावे असे आव्हाहन चिखलदरा तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार मा.शारंग ढोमसे सर यांनी तालुक्यातील जनतेला केला आहे