राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
-मेलघाटातिल चिखलदरा तालुका येथील डोमा गावाच्या चिमुकला शिवम सनोज उइके या आदिवासी विद्यार्थाचा वर्धा जिल्हातील नारा येथील आश्रम शाळेत गादीच्या ढीगारयाखाली दबुन संशयस्पद मृत्यु झाला.या मृत्युवर विद्यार्थांचा नातेवाईकांनी आक्षेप घेऊन चौकशीची मांगनी केली आहे.वर्धा जिल्हातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व.यादवराव केचे या आश्रम शाळेत शिवम सातव्य वर्गात शिकत होता.हि शाळा आमदार दादाराव केचे यांचा संस्थेकडून चालवली जाते.शिवमचे गादीच्या ढीगारयाखाली दबुन मृत्यु झाल्याचे बुधवारी रात्री उघडिस आले.मृतक शिवम याचा मृतदेह संशयस्पद आहे त्या ठिकानी रक्ताचे डाग आढळुन आले. गादिखाली त्याचा मृतदेह लपवुन ठेवण्यात आला.शाळा व्यवस्थापनाने कुठल्याच प्रकाराची माहिती दिली नाही.हा सर्व प्रकार बघता उइके कुटुंबियानी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा मागणी करत शवविच्छेदन थांबवून ठेवले होते.त्यानंतर गुरुवारी सायंकाळी प्रशासनाने नातेवाईकांना विश्वाशात घेत आश्वाशन दिले व त्यानंतर नागपुर येथे इन कैमेरा शवविच्छेदन करण्यात आले.हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप पालकांनी केला त्यामुळे संबंधित शाळाव्यवस्थाना विरुद्ध गुन्हा दाखल करून हि आश्रमशाळा बंद करण्यात यावी अशी मागणी शिवम च्या पालकांनी केली आहे.
-------------------------------------------------------------
_तज्ज्ञ डॉक्टरांच्या पैनलच्या निगरानीत शवविच्छेदन होईल .शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्युचे कारण पुढे येईल.त्यानंतर आवश्यकता भासल्यास पुढील कारवाही केली जाईल.
-सुनील गाड़े- पोलिस निरिक्षक,कारंजा घाडगे
शाळेत नव्यानेच नवीन गाद्या खरेदी करण्यात आल्या आहे.मुले खेळत असतांना हा प्रकार घड़ला असावा.
दादाराव केचे -आमदार आर्वी शाळा व्यवस्थापक...
शिवमचा शाळा सोडण्याचा दाखला अर्ज देऊन मागितला होता. मात्र, दाखला दिला नाही. पोलिसांनी घटनास्थळावरही जाऊ दिले नाही. ज्याठिकाणी मृतदेह आढळून आला तेथे रक्ताचे डाग दिसले. शिवमच्या डोक्यालाही रक्त लागून होते. ज्या गाद्यांच्या ढिगावरून शिवम पडला तो ढीग एक ते सव्वा मीटर उंचीचा आहे. तेवढ्या अंतरावर पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मुलांचा मृत्यू नसून हत्या आहे.
सनोज फत्तेसिंग उईके, मृत शिवमचे वडील