पहीले नवीन Cdpo द्या नंतर वरटे यांना कार्यमुक्त करा...आकोट तालुक्यातील नागरिकांची मागणी...


 राजु भास्करे /अकोला जिल्हा प्रतिनिधी...

प्राप्त माहितीनुसार आकोट तालुक्यांतील महीला बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल वरटे साहेब यांची गडचिरोली येथे बदली झाली आहे. परंतु यांना आतापर्यंत कार्यमुक्त का केले नाही या बाबतीत प्रसारमाध्यमतुन बातम्या प्रसारित होत आहे. परंतु अकोला जिल्हा प्रतिनिधी राजु भास्करे यांनी आकोट तालुक्यातील खेडे विभागात राहणाऱ्या नागरिकांशी वरटे साहेब बद्दल संपर्क साधला असता तर त्यांचे म्हणणे थेट आले आहे की अगोदर आकोट येथिल कार्यलयात नवीन बालविकास प्रकल्प अधिकारी द्या नंतर राहुल वरटेला कार्यमुक्त करा.तसेच राहुल वरटे साहेब यांची ज्या दिवशी बदली ची ऑर्डर पडली त्याच दिवशी वरिष्ठाना कार्यमुक्त करण्याची विनंती केलली आहे. पण मा. आयुक्त कार्यालयाने मदतनीस भरती साठी टाइम बाउंड कार्यक्रम ठरविल्याने मदतनीस भरती करणे अत्यावश्यक होते.  दुसरी महत्वाची बाब म्हणजे जो पर्यंत मा. मु. का. अ. हे वरटे यांना कार्यमुक्त करीत नाहीत तो पर्यंत त्यांना कार्यमुक्त न होता बदली ठिकाणी रुजू होता येत नाही. कार्यमुक्त करण्याचा अंतिम अधिकार हा मा. मु. का. अ. यांचा असते असे समजले जात आहे.  बोलल्या जात आहे कि मदतनीस व अंगणवाडी सेविका भरती साठी कार्यालय किंवा अधिकारी यांच्या हातात कोणतेही गुण दान नसते. या साठी शासनाने सुस्पस्ट जी आर काढलेला आहे. तरीही काही बातमीदार हेतूपूरस्पर अधिकाऱ्यांची प्रतिमा मालिन करण्याच्या दृष्टीने, कोणतीही शहाणीषा न करता फक्त ऐकीव माहितीच्या आधारे बातमी टाकत आहेत. अकोट सारख्या संवेदनशील शहरामध्ये भरती प्रक्रिया राबविणे हे सोपे काम नाही.तरीही या कार्यालयाने पारदर्शक पणे भरती प्रक्रिया पार पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

----------------------------------------

राहुल वरटे यांना अगनवाडी व मदतनीस भरती बाबत विचारले असता तर ज्यांना  भरती बद्दल आक्षेप आहेत. त्यांनी न्यायालत जावे. 8 सप्टेंबर रोजी कार्यालयात पहिल्या यादीवर आक्षेप मागविण्यात आले होते. या मध्ये बहुतांश आक्षेप हे तथ्यहीन होते. ज्या आक्षेपमध्ये सत्यता होती त्या आक्षेपचा फेरवीचार  करण्यात आलेला आहे. ज्यांना भरतीमध्ये भ्रच्टाचार झाला असे वाटत असेल त्यांनी याची रीतसर तक्रार पोलीस मध्ये करावी किंवा असे पुरावे असतील तर या कार्यालयालाही कळवावे म्हणजे हे कार्यालयच पोलिसांत तक्रार करू शकेल. पण संबंधितजवळ कोणताही पुरावा नाही आहे फक्त अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने असल्या बातम्या छापण्यात येत आहे.  असल्या बातमीदारावर कार्यवाही करण्यासाठी कार्यालय कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार करीत आहे.

       राहुल वरटे साहेब

   महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी आकोट

Previous Post Next Post