डॉ संदीप वाकेकर यांना बेस्ट सोशल वर्कर ऑफ द इयर पुरस्कार..सांस्कृतिक भवन येथे जळगाव जामोद आयडॉल सीजन 2 चे आयोजन...


जळगांव जा प्रतिनिधी:-

रविवार, 8 ऑक्टोबर 2023 रोजी आरजू एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटीतर्फे जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवनात राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा "जळगाव (जा) आयडॉल" सीझन 2 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 45 गायकांनी सहभाग घेतला होता. आमदार डॉ. संजय कुटे ,अनिलअसंबे ,डॉ.संदीप वाकेकर, डॉ.सतीश शिरेकर,श्रीकृष्ण केदार,एड.करीम खान,आझम कुरेशी,सय्यद नफीस,लियाकत भाई पत्रकार,रफिक सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मंचावर मा.डॉ.संदीप वाकेकर साहेब यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बघून आरजू एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने "बेस्ट सोशल वर्कर ऑफ द इयर २०२३ अवार्ड" देण्यात आला.गीत गायन स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक करण गोखणे, द्वितीय पारितोषिक अनवार अली व भगवान बाबुळकर यांना देण्यात आले. तृतीय पारितोषिक स्नेहल वानखेडे आणि कुर्बान शाह यांना देण्यात आला. शारिक खान सर,नासिर खान , अजमत खान, अमिर खान ,मुमताज खान ,नाज़ीम नवाज़, मो.मतीन , वसंता कोथळकार या सर्वांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.

Previous Post Next Post