धामणगाव गढीतील डॉक्टर घरी;रुग्ण वाऱ्यावर..शिवसेनेचे सागर डांगे यांनी आणला प्रकार उघडीस..।


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते त्याचा प्रत्येय पुन्हा एकदा ता ३० सप्टेंबर रोजी दिसून आला जवळपास  ४० ते ५० रुग्ण रुग्णालयात बसून अन डॉक्टर घरी हा प्रकार उघडकीस आला सदर आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार धामणगाव गढी येथील शिवसेनेचे पदाधिकारी सागर डांगे यांनी उघडीस आणला त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे डॉ माहूरे एक तासाने रुग्णालयात पोहचले मात्र ज्यांच्याकडे आरोग्य केंद्राची जबाबदारी देण्यात आली त्या डॉ बरखा हरणे मात्र रुग्णालयातील गायब होत्या.तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वाधिक लोकसंख्येचा भार असलेले आरोग्य केंद्र आहे मात्र या आरोग्य केंद्रात मागील काही वर्षांपासून भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे या आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मुख्य वैद्यकीय अधिकारी नसल्याने हा सर्व प्रकार घडत आहेत प्रभारीच्या भरवशावर सुरू असलेल्या कारभाराकडे तालुक्का वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहेत याचा त्रास मात्र परिसरातील रुग्णांना सहन करावा लागत आहे सध्याही असेच प्रकरण शिवसेनेच्या पदाधिकारी सागर डांगे यांच्यामुळे उघडकीस आले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जवळपास  ४० ते ५० रुग्ण रुग्णालयात बसून होते मात्र रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हते जवळपास सव्वा दहाला डॉ माहूरे हजर झाले तोपर्यंत रुग्णांना ताटकळत बसावे लागले सर्वात महत्त्वाचे म्हणजे  या रुग्णालयाची ही पहिली वेळ नाही असे अनेकदा असले प्रकार घडले आहे या प्रकाराला येथील डॉक्टर तथा  तालुक्का वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सागर डांगे यांनी केला आहे.त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे

.......धामणगाव गढी आरोग्य केंद्राची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे यापूर्वी एवढी वाईट स्थिती कधीच झाली नव्हती या वाईट परिस्थितीला फक्त येथील वैद्यकीय अधिकारी तथा तालुक्का वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्या मुळेच या आरोग्य केंद्राला वाईट दिवस आले आहेत त्यांची बदली करणे आवश्यक झाले आहे :-सागर डांगे,तालुक्का उपाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट

.......... या आरोग्य केंद्राला मुखीया नसल्यामुळे येथील कारभार मनमानी सुरू आहे मात्र याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो ज्यामुळे येथे असले प्रकार घडत आहे याला आळा घालण्यासाठी या रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी तेही एमबीबीएस डॉक्टरांची :-विमल फाटकर,सदस्य ग्रामपंचायत, धामणगाव गढी

--------- आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची बदली झाली ज्यामुळे आरोग्य केंद्रात कोणाची ड्युटी होती हे माहिती नसल्याने हा प्रकार घडला मात्र घडलेला प्रकार पाठीशी घालण्यायोग्य नाही त्यामुळे संबंधित डॉक्टरांना शो कॉज देण्यात येईल :-डॉ किरण शिंदे, तालुक्का वैद्यकीय अधिकारी,अचलपूर

Previous Post Next Post