नगर परिषद मराठी शाळा क्रं 1 च्या माजी विद्यार्थ्यांचे 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम अंतर्गत श्रमदान...


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी  निर्देशित केल्याप्रमाणे "स्वच्छता पंधरवड्याचा" एक भाग म्हणून "एक तारीख, एक तास श्रमदान" हा उपक्रम आज मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत श्री संत रुपलाल महाराज नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक 1. जळगाव जामोद या शाळेमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वदिनी या उपक्रमांतर्गत श्रमदान करून शाळेच्या पाठीमागील कचऱ्याचे ढीग उचलले,वर्गखोल्यांची स्वच्छता केली व मैदानाचे सपाटीकरण केले. सकाळी ठीक नऊ वाजता पासून तर बारा वाजेपर्यंत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्साहाने शालेय स्वच्छता केली आणि या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक डॉ. महादेव सातव व नगर परिषद मराठी शाळा क्रं 2 चे मुख्याध्यापक श्री शिवहरी रोजतकार सर, नगर परिषद मराठी शाळा क्रं 4 चे मुख्याध्यापक श्री. अनिल ढगे सर, श्री. गोपाल पाऊलझगडे सर, सौ.ज्योती गाठे मॅडम श्रीमती सविता बनकर मॅडम यांनी  विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ.सातव सर यांनी विद्यार्थ्यांची एक तासिका घेतली त्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक चर्चा केली. उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. सदर कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी इज्जत भाई बेग, विनोद चिपडे, विनायक भगत, शेख सलीम , शेख शब्बीर शेख बुढण, मोहन कावरे, आरिफ खान अफसर खान, शेख नासीर, शेख जुनेद शेख हातम, किशोर अंबळकार सर, अशोक जोध, समीर खान, शेख अशपाक, शेख अफरोज, शेख अजीज आदी विद्यार्थ्यानी एक तारीख एक तास श्रमदान या उपक्रमअंतर्गत शालेय परिसर स्वच्छ करून शाळेप्रती आपला जिव्हाळा व प्रेम व्यक्त केले.

------------------------

आज मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत श्री संत रुपलाल महाराज नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1. मध्ये एक तारीख एक तास श्रमदान यामुळे थोड्या खाली शाळेचे माजी विद्यार्थी श्रमदाना करता उपस्थित झाली होती. त्यांनी अगदी आनंदाने व मन लावून शाळेची स्वच्छता  केली व खोदकाम करून कचऱ्याची विल्हेवाट लावली. एका तासा करिता असलेला हा उपक्रम चांगला चार तास चालला, तो  विद्यार्थ्यांच्या आपल्या शाळेप्रती असलेल्या प्रेमापोटी. जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेमध्ये शिकलेल्या या सर्वच विद्यार्थ्यांना एक व्यक्ती म्हणून व विद्यार्थी म्हणूनही आपल्या शाळेचा अभिमान वाटतो. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले मात्र भविष्यातील पिढी किंवा आपले पाल्य मातृभाषेतून शिकवावे याचे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर महादेव सातव यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना केले.

Previous Post Next Post