बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-
जुन - जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टमुळे मोठ्या प्रमाणात पाउस होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यभरात शेती पिकांचे व शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी आ डॉ संजय कुटे यांनी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांचे कडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्यामुळे सदर शासन निर्णय हा 3 ऑक्टोंबर पर्यंत काढण्याचा माझा निश्चय आहे असे सुतोवाच त्यांनी मागील आठवड्यात सोशल मीडिया च्या माध्यमातून केले होते. या शासन निर्णयामुळे संग्रामपूर व जळगांव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून मोठा आधार मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अमरावती व छत्रपती संभाजी नगर महसूल विभागातील ११ जिल्ह्यातील १४ लाख शेतकरी बांधवांना १ हजार ७१ कोटी ७७ लक्ष इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकरी बंधूंना शेती पिकांचे व जमिनीचे नुकसान पोटी १५१ कोटी आर्थिक मदत त्यांच्या खात्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरीत केली जाणार आहे. यामध्ये जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील प्रस्तावानुसार १० हजार ६७८ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असून त्यापोटी ३५ कोटी ४० लक्ष रुपये एवढी आर्थिक मदत शासनाद्वारे मंजूर करण्यात आली आहे तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी ११५ कोटी ४० लक्ष इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे.
