धनगर समाज आरक्षणाला विरोध करीत जय आदिवासी युवा शक्तीचे आंदोलन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जय आदिवासी युवाशक्ती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री यांना तहसिलदार यांच्या मार्फत धनगर आरक्षणा विरोधात निवेदन सादर करण्यात आले.निवेदनामध्ये   खरे पाहता धनगर हे अतिश्रीमंत लोक राजकीय प्रभाव असणारे राजे महाराजांच्या कुळातील लोक यांना आदिवासी आरक्षण फक्त आपल्या स्वार्थासाठी पाहिजे. कोणत्या अर्थाने धनगर आदीवासी आहेत. आदिवासी हा जन्मता झालेला आदिवासी बनवला जात नाही हा घटनेचा अपमान असेल ,मा. मुख्यमंत्री साहेबांनी धनगर समजाला आदिवासिंच्या सवलती देऊ असे बेताल वक्तव्ये केले तसेच बाबनकुळेनी सुधा धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा,अशा प्रकारचे पत्र पाठवून खऱ्या आदिवासींवर अन्यान करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजाचे म्हणने आहे की आदिवासींच्या संयम पाहू नका. आणि बोगसाना S.Tमध्ये समविष्ट करू नये तसाच आदिवासी समाज अठरा विश्व दारिद्र्यात जगत आहे त्याउलट धनगर समाज श्रीमंत असुन अशा धनदांडग्या धनगर समाजाला S.T मध्ये समाविष्ट करून घेऊ नये.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या निवेदन देतेवेळी सोपान सोळंके जिल्हाध्यक्ष,संगीताबाई बारेला नारीशक्तीजिल्हाध्यक्ष.            सुमित पालकर जिल्हाध्यक्ष अनील सस्त्या,रोहन केदार राधेश्याम खरात, हुसेन पालकर यांच्यासह जय आदिवासी युवाशक्ती बुलढाणा चे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post