कारंजा शहरात शिक्षणाचा अवैध बाजार थाटला जात आहे.


विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

खाजगी संस्था चालकाकडून विनापरवानगी सीबीएससी अभ्यासक्रम शिकवणी पालकांकडून अवाढव्य फी वसूल विदर्भात शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या कारंजा नगरीत शिक्षणाचा  अवैध बाजार थाटला जात असून अनधिकृत पने विनापरवानगी सीबीएससी पॅटर्न शिकऊन पालक आणि विद्यार्थी यांची फसवणूक केली आहे. कारंजा शहरात गेल्या तीनचार वर्षापासून विनापरवानगी सीबीएससी पॅटर्न शिक्षण देणाऱ्या सुमारे २२ शाळा चे पितळ उघडे पडले असून आता या शाळा वर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारंजा शाखा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कारंजा शहरात शिक्षणाचे बाजारीकरण करणारे हे संस्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांना खुलेआम फसवणूक करीत असताना आपल्या पाल्याच शिक्षण चांगलं व्हावं यासाठी पैशाची चडाऔढ करणारे पालक गप्प आहेत मात्र मनसे च्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न लाऊन धरला असून यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी याच्या दालनात निवेदन देऊन संबंधित शिक्षण संस्था वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे . कारंजा शहर हे शाळेचे शहर अशी ओडख असणारे शहर होण्याच्या मार्गावर आहे या रोजी शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने या व्यवसायात चांगले चांगले नामांकित उतरले आणि आपल्या संस्थेत भौतिक सुविधा दाखवीत पालकांना आकर्षित करून शिक्षणाच्या नावावर लाखो रुपयांचे भागभांडवल उभे करीत करोडो रुपये कमावित असल्याने अनेकांनी यात उडी घेऊन हा बाजार मांडला यात ग्रामीण माणूस बळी पडला असून शहराच्या पंधरा वीस किलोमीटर अंतरावरील शेतकरी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी हजारो रुपये डोनेशन देत आपल्या पाल्या ला चांगले शिक्षण मिळेल या बाभळ्या आशेवर स्वतःची फसवणून करीत असल्याचे उजागर झाले आहे. शहरातील एक शाळा वगळता बाकी सर्व शाळा वर शिकविले जाणारे सीबीएससी पॅटर्न हे विनापरवानगी असल्याने या शिक्षणाचा परीक्षेत काहीही फायदा होणार नसल्याचे सिद्ध झाले आहे याउलट हे शिक्षण घेणारे विद्यार्थी अडचणीत आले असून महाराष्ट्र एसएससी बोर्ड ची परीक्षा आणि अभ्यासक्रम हा सीबीएससी असा खेळ खंडोबा झाल्याने परीक्षेत येणाऱ्या अभ्यासक्रमात चागला घोड झाला आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करूनही त्याचा फायदा परीक्षेत होणार नसेल तर ? विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या या शिक्षण संस्था आणि संस्था चालकावर काय कार्यवाही होणार याकडे कारंजा वासियांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post