तेज फाउंडेशनच्या पाच व्या वर्धापनदिनानिमित्त नि:शुल्क आरोग्य शिबीर संपन्न...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

तेज मल्टीपर्पज फाउंडेशन समाजिक संस्थेचे २०१८ साली  तेजस प्रकाशचंद झांबड अंतरराष्ट्रीय युवा भूषण समजसेवी व उधोजक यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आले होते व कार्य मानवता के लिये (वर्क फॉर हुमानिटी) या मूळ नारा ने तसेच समाजिक,शैक्षणिक,आध्यात्मिक,पर्यावरण,आरोग्य या पाच मूळ उद्देशावर नेहमी नी:शुल्क सेवाकार्य चालू असते व गरजू लोकांना सतत लाभ मिळत असते.तेजस झांबड यांचा प्रयत्नाने व विविध सेवा प्रकल्पाद्वारे संस्थे चे नाव राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर वर पोहचले आहे  नुकतेच संस्थेच्या पाचवा वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबीर लिओ क्लब खामगांव मेन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मराठा समाज सभागुहात आयोजित करण्यात आले होते व शिबीर ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करण्यात आले. विशेष उपस्थितीत  प्रवीण कदम नगर सेवक व डॉ पूजा खेतान अकोला यांची होती व प्रमुख उपस्तीथी तेजस झांबड संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट लिओ चेअरपर्सन, अमित बोरा लिओ क्लब खामगांव मेन अध्यक्ष यांची होती.या शिबीर ला डॉ. नितेश मेघवानी,डॉ शेख,डॉ पूजा खेतन यांनी डोळे चे आजार बाबत चांगले मार्गदर्शन केले व सर्व डॉक्टरांनी जवळ पास १५० लोकांची  डोळे,बी.पी,गुडवे आदी शरीरक तपासणी केली व औषध ही दिले. कपिल वर्मा,प्रथमेश पाटील,आदित्य फुंडकर आणि सिमरनकौर चव्हाण,खुशी इंगळे,साक्षी वानवे,यशश्री इंगळे,पल्लवी इंगळे आदी उपस्थित होते आणि तेज फाउंडेशन च्या वतीने  डॉक्टरांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले व शिबीर ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला...

Previous Post Next Post