जळगांव जामोद तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मा. प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात ४/१०/२०२३ बुधवार रोजी या वर्षी झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले, हजारो हेक्टर जमिनी खरडून गेली त्यामुळे जळगांव जामोद, संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. नुकसान होऊन २ महिने झाले तरी अध्याप कुठलीही आर्थिक मदत शेतकर्याँना झालेली नाही. चालू वर्षाचा २५ टक्के विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा. खरडून गेलेल्या शेतीची मदत तात्काळ जमा करण्यात यावी. जळगांव जामोद शहरातील नदी काठावरील वंचित लोकांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात यावे. सोयाबीन पिकावर आलेल्या एलोमोझक प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करुन शासनाने आर्थिक मदत जाहिर करावी या मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनाला शिवसेना,कॉग्रेस, वंचित, एमआयएम, वन बुलढाणा नेशन, रिपाई गट यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष एम.डी.साबीर, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, कार्याध्यक्ष महादेव भालतडक, करीम खान, विश्वास भालेराव, विठ्ठल वाघ, सौ.वर्षा वाघ, सौ.सविता देशमुख, मोहसिन खान, रामेश्वर मानकर, एकनाथ ताठे, दादाराव धंदर, वामन गुडेकर, श्रीकृष्ण जाधव, सुरेश पाचपोर, राजू अवचार, तुकाराम वाघ,दत्ता डिवरे, ईरफान खान, बबलु जाने, योगेश कुंवर, बंटी शंकपाल, दिलीप वसतकार, मंगल डोंगरदिवे, जनार्धन वाघमारे, अताउल्लाह पठान, संजय चोपडे, राजु जाधव, सिध्दार्थ हेलोडे, ताहेर माही, जावेद छोटु, शेख जाकिर, खालिद माहि, नितीन कुनगाडे, रोशन हेलोडे, अक्षय रायपुरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन...सरकारने जाहिर केलेली मदत तुटपुंजी शेतकर्याँना भरीव मदत द्या - जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
