CEIR पोर्टल च्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना आले यश...


 विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक 4 आँक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून कारंजा तालुक्यातील गहाळ झालेले 14 मोबाईल मालकाला परत मिळून देण्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई  करून 14 जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून सी. ई. आय. आर. पोर्टल वरून शोध घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या हस्ते तक्रारदारास दि. 04 सप्टेंबर रोजी परत करण्यात आले.परत करण्यात आलेल्या 14 मोबाईलची किंमत  अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपयांच्या जवळपास होती. या संदर्भात हरवलेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून CEIR पोर्टल च्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात आला. या कार्यावाही मध्ये सायबर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भुशन गावंडे,नापोकाॅ बालाजी महल्ले, पोकाॅ वैभव गाढवे,मपोकाॅ पुष्षा मनवर यांनी सहकार्य केले. यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल गहाळ झाल्यास संबंधित पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिम च्या वतीने करण्यात आले.

Previous Post Next Post