कामरगाव ते धोत्र्याच्या मधामध्ये टू व्हीलर चा अपघात...


 विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

या अपघातामध्ये प्रकाश किसनराव देवकर राहणार अमरावती हे जखमी झाले आहे.त्यास रोडवर कारंजा अमरावती कडे जात असताना महेंद्र  धनसकर सरांना यांना हा अपघात दिसला त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबून अपघाताची माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कामरगाव येथील पायलट देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना तात्काळ घटनास्थळी जाण्यास सांगितले.महेंद्र  धनसकर  सर यांनी त्यांच्या नातेवाईक संपर्क साधून घटनेची पूर्ण माहिती सांगितली व त्यांना अमरावती येथे थांबण्यास सांगितले. खरच अशा वेळेस प्रश्न एखाद्या वेळेस नातेवाईकाचा पडतो. पण अशा वेळेस धरणसकर सरांनी जी तत्परता आणि समय सूचकता  दाखवली ती खरोखरच अभिमानाची बाब आहे.श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपातकालीन पथक कारंजा दत्त (गुरुभूमी ) रुग्णसेवक रमेश देशमुख

Previous Post Next Post