वाशिम जिल्ह्यातील कारंजा(लाड)तालुक्यातील स्थानिक सन्मती ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूल द्वारा आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष २०२३ अंतर्गत सर्वांना तृणधान्य, कडधान्य व रानभाज्यांची माहिती व्हावी या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन केले होते.आजच्या फास्ट फुडच्या युगामध्ये आजची तरूण पिढी लहान मुले सात्वीक आहारा पासून दूर जात आहेत.त्यांना रानभाज्या, कडधान्य व तृणधान्य आणि त्यापासून बनविले जाणारे विविध पदार्थ यांची माहिती मिळावी व हे सर्व आरोग्यासाठी कसे उपयोगी आहे याचे ज्ञान व्हावे या दृष्टीने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते अशा या प्रदर्शनीचे कारंजा(लाड) मध्ये सर्व प्रथम आयोजन केल्या गेले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाघाटक तालुका कृषी अधिकारी रविंद्रजी जटाळे, प्रमुख पाहुणे अतुल क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी, प्रेमानंद राऊत कृषी सहाय्यक, विद्याभारती कॉलेज चे प्राचार्य अशोक देवरेम, डॉ. दीपक गुल्हाने, प्रसन्ना पळसकर , शाळेच्या अध्यक्षा सुधाताई चवरे सचिव गुंजन चवरे संचालक मंडळातील आमोद चवरे नमन चवरे शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली कळंबे प्री. प्रायमरीच्या मुख्याध्यापिका अश्विनी गायकवाड उपस्थित होते. विशेष रानभाज्यापासून तयार केलेल्या विशेष पुष्पगुछांनी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. व कार्यक्रमाची उद्घघाटन फीत व दरवाज्यांची तोरणे व सजावट ही सुद्धा सर्व प्रकारच्या रानभाज्या व फळांनी करण्यात आली. रानभाज्या पासून बनविण्यात आलेल्या चहा व नाश्ता यांचा आस्वाद घेत प्रदर्शनी बघण्यास येणा-या पाहुण्यांनी व पालकांनी मुलांचे तसेच शिक्षकवृंदाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षक सुदर्शन दर्यापूरकर व आभार प्रदर्शन विवेक देशमुख यांनी केले या प्रसंगी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेचे संचालकानी मार्गदर्शन करून शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही प्रदर्शनी मोठ्या उत्साहात पार पडली.प्रदर्शनीचे कारंजा मध्ये सर्वप्रथम घेतल्या गेलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला कारंजेकरानी भरभरून प्रतिसाद दिला.असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले
सन्मती झानमंदिर इंग्लिश स्कूल व्दारा आयोजित तृणधान्य, कडधान्य व रानभाज्याची प्रदर्शनी संपन्न...
विश्वास कुटे /वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
