शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांचे सर्व मंडळांना सूचना डीजे मुक्त प्रत्येक उत्सव साजरे करावे.शेगाव शहरातील सर्व मंडळांना शेगाव शहरातील पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आणि पर्यायाने शेगाव शहरात सुद्धा अतिशय उत्साहात साजरा झाला परंतु प्रसार माध्यमातून मिळालेल्या बातमीनुसार आपल्या लक्षात आलं की यावर्षी डीजे" आणि डॉल्बीचा वापर करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्यामुळे नाशिक येथे लेझर मधून किरणांमुळे जवळपास सहा लोकांना प्राप्त झालेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात ते आठ लोक विजेच्या भयानक आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावलेले आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आगामी काळात सुद्धा नवदुर्गा वाजवू उत्सव शारदा उत्सव हा जगदंबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो संतनगरी शेगाव येथे सुद्धा अशा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे तर एका संत नागरिक शेगाव शहर येथे सर्व नवदुर्गा उत्सवाच्या सन्माननीय मंडळांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे.आपण संतनगरी शेगाव येथील नवदुर्गा उत्सव डीजे" विरहित नवदुर्गा उत्सव साजरा करून पारंपारिक वाद्य वाजवू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श' उत्सव आणि शेगाव संत नगरी येथे सादर होईल या उत्सवावरून बाकीचे सुद्धा प्रेरणा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी डीजे मुक्त शेगाव शहरातील सेवा करावी असे आवाहन शेगाव शहराचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केली आहे.
डीजे मुक्त उत्सव साजरे करा-शेगाव ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या सर्व मंडळांना सूचना...
अनिल भगत/बुलडाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
