सन्मान परिवाराच्यावतीने कुंवरदेव शाळेत माझी भाकर माझा अभियान स्पर्धा...


 जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद सन्मान परिवार जळगाव जामोद च्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुवरदेव येथे माझी भाकर माझा अभिमान ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली घरी स्वयंपाक करताना आईला काय त्रास असतो हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहीत असते त्याची जाणीव त्यांना असते शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्वयंपाक करताना आईला काय त्रास असतो याची जवळपास फार जाणीव नसते विद्यार्थ्यांना लहान वयातच घरातील घरकामे शेतीकाम लहानांचा सांभाळ करणे इत्यादी बाबत त्यांना अनुभव यावा यासाठी जिल्हा परिषद शाळेत मुलांना चुलीवरच्या भाकरी करता यावीत यासाठी सन्मान परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम सुरुवात केला आहे चुलीवर भाकरीची स्पर्धा त्यांनी आयोजित केली या स्पर्धेत सात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस तर तीन विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे विस्तार अधिकारी मोरे, सन्मान परिवाराचे, फाफट सर, गावचे सरपंच शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व गावकरी यावेळेस उपस्थित होते.

Previous Post Next Post