आसलगाव उप बाजार समितीत भव्य बक्षीस योजनेची सोडत...


 श्रीकांत आळशी/नांदुरा ता.प्रतिनिधी...

आसलगाव उपबाजार येथे जळगांव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत परिसरात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोत्सांहनपर भव्य बक्षीस योजनेची सोडत आज दिनांक 3 आक्टोबरला करण्यात आली. जळगाव जाऊन बाजार समिती हा नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी बांधवांसाठी माहे जुलै 2023 पासून भव्य प्रोत्साहन पर बक्षीस योजना सुरू केली आहे.आज झालेल्या भव्य बक्षीस योजने मध्ये सखाराम पाडुसींग पावरा रा. ईस्लामपुर (7741838607) या आदिवासी शेतकरी बंधु चे पहिले बक्षीस लागले असुन त्याना संचालक मंडळींच्या हातुन बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी बक्षीस वितरण करतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मानिक वाघ,दत्ताभाऊ पाटील, प्रभात पाटील,मनोज राठी, माहादेव भालतडक, मनोहर वाघ, शैलेश दैय्या व उल्हास माहोदे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते..

Previous Post Next Post