शेतकऱ्यांचे काम सहा महिने नव्हे तर वर्ष वर्ष थांब याप्रमाणे शासकीय अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना वेठीस धरून पैशाची मागणी करून तसेच पार्टी घेऊन करतात कामे.याबाबत कोळगाव येथील चिमुकला चि.रूद्र शेडंगे याचे वडीलांना शेतातील पेरणी पासून ते काढणीला आलेल्या पिकांना रोही,हरीण,वानर,यांच्या उपदव्यपामुळे नुकसान होऊ नये म्हणून रात्रन दिवस शेतातच राहावे लागत असल्यामुळे वडिलांच्या काळजी पोटी राज्याचे कृषी मंत्री यांचेकडे पत्र लिहून या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करावा या करिता सबंधित अधिकारी कर्मचारी यांना मी जमा केलेल्या गल्यातील पैशाची पार्टी देतो.परंतु माझ्या सर्व शेतकरी बापाची यातून सुटका करा अशी मागणी केली आहे.
प्रति,कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य
काल माझ्या पप्पा च्या मोबाईल वर पाहील की पार्टी दिली की सरकारी लोक काम करतात मग मी तुम्हाला गल्ला फोडुन त्यातील पैश्याची पार्टी देतो आमचे पप्पा पोळा झाला लक्ष्मी झाल्या गणपती झाले परंतु पप्पा रात्रंदिवस वावरात आहेत मी त्यांना फोन करून विचारलं पप्पा घरी कधी येणार तर पप्पांनी सांगितलं आपल्या वावरात जंगलातील रोही वानर हरीन सोयाबीन खातात त्यामुळे मी घरी येणार नाही साहेब, तुम्हाला पार्टी देतो आमच्या वावरातील रोही वानर चा बंदोबस्त करा त्यांना आमच्या वावरात येऊ देऊ नका मग माझे पप्पा घरी येतील सरकारी लोक पार्टी घेऊन योजना देतात मग आमच्या पण सोयाबीनला भाव द्या पिक विमा द्या कर्ज पण माफ करा मी तुम्हाला साहेब पार्टी देतो माझ्या गल्यातले पैसे पप्पाच्या चोरून घेऊन तुम्हाला पार्टी देतो साहेब
चि.रुद्र विजय शेंडगे
रा कोळगाव ता मालेगाव जि वाशिम
