जळगांव जामोद तालुक्यात दिनांक २२ जुलै रोजी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.हजारो लोकांची घरे पुरात वाहून गेली,शेती खरडून नदी सारखी अवस्था झाली, जनावरे वाहून गेली.लहान लहान दुकाने थाटून व्यवसाय करणारे लोकांची दुकाने बरबाद झाली. एवढी वाताहात झाली असतांना ४८ तासात मिळणारी सानुग्रह निधी आजही ७५ दिवस उलटले तरी शेकडो न्याय पुरगरस्था मिळाला नाही.शेतीचे फक्त पंचनामे झालेत,आजपर्यंत ढेलाही शेतकरी वर्गाला मिळाला नाही.खरडून गेलेली शेती,वाहून गेलेली जनावरे,घरात घुडलेलं पाणी ह्यात जनता त्रास झाली त्यात कागदपत्रे जमा करण्यात महसूल प्रशासनाने बेजार केले.तरीही शेकडो लोकांना आजही सानुग्रह निधी मिळालं नाही. म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड विजय फोन कर यांनी महात्मा गांधी जयंती दिली २ ऑक्टोबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आराम आमरण उपोषण आरंभ केले आहे. जोपर्यंत आपत्तीग्रस्तांना न्याय मिळणार नाही आणि तहसीलदार यांचे वर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण निरंतर असेच सुरू राहील असा इशारा सुद्धा त्यांनी दिला .तहसीलदार श्रीमती सोलट ह्या लोकांशी मगृरीने वागतात,ओरडून बोलतात. पत्रकार संघाचे प्रतिनिधी त्यांना निवेदन द्यायला गेले असता त्यांना सुद्धा एक तास ताटकळत उभे ठेवले, रेतीचे तस्कर त्यांना भेटायला गेले की त्यांना वेळ देतात कित्येक रेती तस्कर त्यांच्या सेवेत हजर असतात त्यांच्या घरी दही दूध भाजीपाला पोचवतात रेती तस्करांची सतत तिथे आव बघत होते.या तालुक्यतील जनता आत्मदहन कर्ती झाली तरी शासन या तहसीलदार वर कारवाई करीत नाही.या करिता या भागातील सामाजिक कार्यकर्ते कॉ. विजय पोहनकर ह्यांनी उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद ह्यांना निवेदन दिले होते.तहसीलदार ह्यांच्या आक्रयक्षम पनाची चौकशी करा.नाहीतर गांधी जयंती २ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करेल.त्या निवेदनावर कुठलीच कारवाई झाली नाही,म्हणून विजय पोहनकर ह्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे..
७५ दिवस उलटूनही पूरग्रस्तांना न्याय नाही,तात्काळ न्याय देण्यासाठी आमरण उपोषण सुरू...
जळगांव (जामोद)प्रतिनिधी:-
