मानोरा पोलीस स्टेशन निरीक्षक प्रवीण शिंदे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.


 विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक ४ ऑक्टोंबर 23 रोजी महाराष्ट्र न्युज 24 लाईव्हचे मानोरा  तालुका प्रतिनिधि पत्रकार अमित चव्हाण यांनी मानोरा पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त मानोरा पोलीस स्टेशन निरीक्षक (ठाणेदार) प्रविण शिंदे साहेब यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले व महाराष्ट्र न्युज 24 लाईव्ह चैनल च्या वतीने  दिली पुढील कारकीर्द करिता सदिच्छा भेट.पोलीस म्हटलं की आठवते  वर्दीतला माणूस,, गर्दी असली तरी वर्धितला माणूस ओळखता येतोच,,आणि या वर्दीतल्या माणसामुळे गर्दीतले सण उत्सव साजरे होतात कारण की आम जनता सण उत्सव साजरी करतात परंतु या वर्दीतल्या माणसाला सण उत्सव जनतेच्या सेवेतच करावे लागतात.सेवेमध्येच 24 तास असतात. ऊन, वारा, पाऊस, रात्र- दिवस आणि लॉक डाऊन मध्ये तर उपाशी सुद्धा राहावं लागलं. यांना 24 तास ड्युटीवर असताना दंगल असो की एखादा उत्सव त्यांना हा उत्सव घरी साजरा न करता जनतेमध्ये सेवेतच हा उत्सव साजरा करावा लागतो माणसाने वर्दीतला या माणसाला माणूस समजून घ्यावे आणि वर्दीतल्या या माणसाला मन असते भावना असतात ही सद्भावना जनतेमध्ये रुजू व्हाव अशीच आमच्या माध्यमाद्वारे आशा व्यक्त करतो पोलीस प्रशासन आहे तर आज शांतता आणि सुव्यवस्था अबाधित आहे. आपण बघितलेच असेल त्यांचे ब्रीद वाक्य "रुद्रक्षणाय खलनिग्रणाय" आम जनतेचे रक्षण करणे आणि जो कोणी या जनतेला त्रास देत असेल त्याला वाटेला लावणे आणि गरिबांना न्याय देणे पोलीस प्रशासनाचे काम असून त्यांची सेवा ही एक कर्तृत्ववान आणि कौतुकास्पद बाब आहे... जसे की आपण चित्रपट बघतो सिंघम तसेही आज सिंघम सारखे अधिकारी हयात आहेत म्हणूनच आज जनता आरामाचा झोपू शकतात आणि आपले कामे करू शकतात.. अशा अधिकाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तर्फे मानाचा मुजरा करतो सलाम करतो.. ही बाब आम जनतेने लक्षात घ्यावी हिच आमच्या माध्यमांची इच्छा

Previous Post Next Post