सुनगावात ई पिक पेरा भरण्यासाठी जनजागृती रॅली... गावचे तलाठी वाघ व कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी राबविला अनोखा उपक्रम...


 जळगांव जा. प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील महसूल व कृषी विभागात येत असलेल्या सुनगाव येथील शेतकऱ्यांना ई-पिक पेरा भरण्यासाठी वारंवार शासनाकडून सूचना दिल्यानंतरही आतापर्यंत जवळपास 50% शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा भरला नसल्यामुळे महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव येथे तलाठी गौतम वाघ व कृषी मित्र मोहनसिंह राजपूत यांनी शेतकऱ्यांना ई-पिक पेरा भरण्यासाठी जनजागृती व मार्गदर्शनपर रॅली द्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती साठी हा अनोखा उपक्रम राबविला. काल दिनांक 5 ऑक्टोबरला गावामधून मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे विद्यार्थी सोबत घेत गावचे तलाठी गौतम वाघ व कृषी विभागाचे महत्त्वाचे दुवा म्हणून सुपरिचित असलेले कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, माजी सरपंच पुंडलिक पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, शालिग्राम भगत,विष्णू येऊल,गजानन दातीर,बळीराम धुळे,सुरेश जोशी,शालीग्राम ढोले,आशा सेविका, यांनी शेतकऱ्यांना ई- पीक पेरा भरावा यासाठी जनजागृती रॅली काढून गावातील शेतकऱ्यांमध्ये ई- पीक पेरा भरण्यासाठी महत्वपूर्ण उपक्रम राबविला. यामध्ये गावच्या सरपंचासह सामान्य नागरिकांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात  सहभाग नोंदविला. सुनगाव भाग एक व भाग दोन तसेच चालठाणा व इतर साझामध्ये ई पिक पेरा शेतकऱ्यांनी भरला नसल्याने शेतकऱ्यांना पुढील सर्वच अनुदानापासून वंचित रहावे लागेल म्हणून प्रशासन व गावातील नागरिकांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातून ई- पीक पेरा भरण्यासाठी रॅली काढून शेतकऱ्यांनी पीक पेराभरा असे नारे देत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी तलाठी गौतम वाघ व कृषीमित्र मोहन सिंह राजपूत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात प्रात्यक्षिकाद्वारे ई-पिक पेरा कसा भरावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.गजानन कपले,मारोती कोथळकार,संजय निमकर्डे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन यांना प्रात्यक्षिकाद्वारे कृषी मित्र मोहन सिंह राजपूत व तलाठी गौतम वाघ यांनी ई-पिक पेरा कसा भरावा हे सांगितले... या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा असून यामुळे ई-पिक पेरा अद्यापही भरलेला नसलेले शेतकरी या उपक्रमाद्वारे ई- पीक पेरा भरतील.

Previous Post Next Post