ग्रामपंचायत पोट निवडणुकीदरम्यान 100 मीटरच्या आत व पोलीस चौकी पासून 30 मीटर वरून खुलेआम अवैध दारू विक्री...


 विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

कामरगावातील प्रकार,धनज पोलिसांचा ठरला रेट अवैध  देशी दारू विक्री थेट..धनज पोलिसांच्या ठाणेदाराच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह.कामरगाव येथे विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्राम पंचायत सदस्य पदासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानुसार कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे देखील प्रभाग क्रमांक 6 मधील एका रिक्त सदस्य पदासाठी 5 नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले मात्र यावेळी एक वेगळाच प्रकार समोर आल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्रामपंचायत पोटनिवडणुकी दरम्यान 100 मीटरच्या आत पोलीस चोकी च्या 30 मीटर वरून खुलेआम अवैद्य देशी दारू विक्री व पेट्रोल विक्री केल्याचा प्रकार कामरगावात रविवारी उघडकीस आला .त्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्रामपंचायत पोटनिवडणूक शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक असलेल्या गावात परवानाधारक दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला .मात्र यावेळी कामरगावात परवानाधारक दुकाने बंद होती तर अवैध्य दारू विक्री पोलीस चौकी पासून अवघ्या 30 मीटरवर खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले त्यामुळे धनज पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे कामरगावात पोलिसांकडून एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासल्या गेली .पोलिसांच्या मुकसंमतीने ही अवैध दारू विक्री होत असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले. पत्रकारांना अडवणूक मात्र निवडणूक मतदान केंद्राच्या  100 मीटरचे आत  दारू विक्री पेट्रोल विक्री चालते  पण पत्रकार यांना मतदानाची टक्केवारी विचारण्याकरता गेलो असता तुम्ही सेंटरच्या परिसरात चक्रा मारू नका अशी अडवणूक पोलीसान कडून करण्यात आली निवडणूक सेंटरच्या बाहेरच थांबन्याचा आदेश च पत्रकाराला   पोलिसांनी दिला अशीच  काळजी मात्र  पोलीस चौकीच्या 30 मीटर अंतरावर हो मतदान केंद्राच्या  हाकेच्या अंतरावर  असलेल्या अवैध धंद्यावर मात्र अंकुश ठेवने गरजेचे वाटले नाही वाटल्यास अवैध पेट्रोल विक्री च्या धंद्यावाल्यांसोबत मतदान केंद्रपरिसरातील  कर्तव्य ची ड्युटी सोडून गप्पा मारताना  पोलीस दिसत आहे त्यामुळे वरिष्ठ घडलेल्या प्रकाराची दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे आता कामरगाव वासियांचे  लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post