मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांची मनमानी...


 विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा देण्याचे असले, तरी शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे सेवेचा बोजवारा उडाला आहे़ दिवसभरात पाच ते सहा तासच दवाखाना उघडा असतो़ या दयनीय अवस्थेमुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार हे प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात खेडेपाडे हे प्राथमिक आरोग्य केंद्रला जोडलेली आहेत. या आरोग्य केंद्रात सुरुवातीच्या काळात रुग्णांना योग्य सेवा मिळत असे; मात्र काही दिवसांनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केंद्रातील सेवेचा बोजवारा उडाला आहे़ वैद्यकीय अधिकारीच वेळेत हजर नसल्याने कर्मचारी याचा गैरफायदा घेऊन वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ रुग्णांना सेवा वेळेत मिळत नाही़ अनेक वेळा दवाखान्याला कुलूप असल्याने व कर्मचारी हजर नसल्याने महिलांना खाजसगी आणलेल्या वाहनातच बाळाला जन्म द्यावा लागतो़ तसेच,रुग्णांना आरोग्य केंद्रात तासन तास डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते़ परिणामी, दवाखाना बंद असल्याने आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर रुग्णांना झोपून राहावे लागते़ या आरोग्य केंद्राच्या गालथान कारभारामुळे रुग्णांना उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात नेले जाते; परंतु दवाखानात सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने रुग्णालयात गैरसोय होताना दिसत आहे  शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे़ याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष देणे गर्जेचे आहे व समस्यांचा विळखात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे़ येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर राहत नाहीत,सध्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन व रुग्णांना आरोग्य सेवा वेळेत देण्याच्या सूचना देण्यात यावे व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आशी मागणी खेड्याती रूग्णाकडुन केली जात आहे.

Previous Post Next Post