मिळालेल्या माहिती नुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा(लाड)तालुक्यातील स्थानिक कारंजा(लाड)वाशिम रोड वरील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी कारंजा(लाड)दुतीय वर्ष तिसरा सेमिस्टर,पहिले सेशनल परीक्षा देण्याकरिता दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी,विद्यार्थी महाविद्यालयात गेले असता, विद्यार्थ्यांना पेपर सुरू असताना महाविद्यालया तून बाहेर काढण्यात आले.पेपर देऊ दिले नाही.यावेळी विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे सहसंचालक कार्यालय अमरावती यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ त्यावर कारवाई करत,30 ऑक्टोंबर 2023 रोजी पत्र क्र. विकाअ/ लले/2023/3002 महाविद्यालयाला पाठविण्यात आले.पण त्यांना पत्राद्वारे,असे सांगण्यात आले की आपण विद्यार्थ्यांना कुठल्याही शुल्क भरण्याच्या कारणा पासून परीक्षे पासून कोणत्याच विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नये, असं केल्यास महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात येईल.तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी 31ऑक्टोंबर 2023 रोजी,विद्यार्थी महाविद्यालय मध्ये पेपर देण्याकरिता गेले असता, व पेपरचे मागणी करत असताना महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट मनोज जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली तसेच महाविद्यालयाच्या बाहेर बळजबरीने हाकलून लावले. विद्यार्थ्यांनी वारंवार महाविद्यालयात शिकण्यासाठी गेलो असता, विद्यार्थ्यांना ही शुल्क एकाच वेळी भरण्याची सक्ती केली.FRA विरुद्ध फी एकाच वेळी 89,000 रुपये नगदी स्वरूपात आत्ताच भरा असे सांगितले, व सर्व विद्यार्थ्यांना पेपर पासून वंचित ठेवले.फक्त शुल्क भरण्याचा कारण देत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी पेपर पासून वंचित ठेवले.तरी सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक1नोव्हेंबर 2023 रोजी सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती यांच्याकडे तक्रार केली.तसेच दुसऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन ट्रान्सफर व महाविद्यालयावर कठोर कारवाई करून आमच्या सर्वांचा भविष्याचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा असे विनंती करण्यात आली.
वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी यांचा अंधाधुंद भोंगळा कारभार..शुल्क न भरण्याचे कारण देत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ठेवले येणाऱ्या परीक्षेच्या पेपर पासून वंचित...
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे...
