जळगाव जामोद मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र उभारण्या संदर्भात जुलै २०२३ अधिवेशनात मंत्री उदय सामंत व संबधित विभागाकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता, जळगाव जामोद मतदार संघात आता औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई उपलब्ध असून औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी वातावरण पोषक आहे.जळगाव जामोद व शेगाव तालुक्यामध्ये अद्याप औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले नव्हते तर संग्रामपूर येथे आधीच आद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे, परंतु आवश्यक सुविधा कमी पडत असल्याने त्याचा विस्तार करता आला नव्हता, भविष्यात गरजेनुसार याही क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे, मतदारसंघात आता उद्योगासाठी लागणाऱ्या भौतिक सोयीसुविधा निर्माण झाल्या असून चोंढी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण लवकरच केल्या जाणार आहे.आलेवाडी, अरकचेरी हे लघु सिंचन प्रकल्प तसेच महाकाय जिगाव सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जात असून पाण्याची मुबलक सोय लवकरच उपलब्ध होणार आहे.सोबतच वाहतुकीसाठी आवश्यक असलेले राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग उपलब्ध आहेत, रेल्वे सुविधासुद्धा उपलब्ध होणार असून त्याचे जमीन अधिग्रहण करण्याचे कार्य सध्या केल्या जात आहे, औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास आवश्यक असलेली शासकीय जमीन उपलब्ध असून त्याची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी संबधित विभाग दिवाळी नंतर करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.जळगाव जामोद व शेगाव तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मुलभूत सुविधा जसे कच्चा माल, मनुष्यबळ, रस्ते, वीज, मुबलक पाणी, रेल्वे लाईन, सोलर वीज ह्या दृष्टीक्षेपात आल्याने आता हा मतदारसंघ औद्योगिक विकासाकडे मार्गक्रमण करणार असून त्याकरिता शासन पूर्णतः सकारात्मक भूमिका घेत आहे. त्या अनुषंगाने अनेक वर्षापासून जळगाव जामोद व शेगाव येथील MIDC स्थापित करण्याबाबतची मागणी पूर्ण होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळेल व मतदार संघामध्ये नवीन उद्योग येण्याकरिता चालना मिळनार आहे अशी माहिती आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली.जिल्ह्यातील एकमेव संत्रा प्रक्रिया उद्योग सोनाळा येथे शासनाने मंजूर केले असून त्याचेही काम प्रस्तावित केले आहे, संत्रा प्रक्रिया केंद्र उभारल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. इथेनॉल निर्मिती व साखर कारखान्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने नजीकच्या काळात साखर कारखाना व इथेनॉल निर्मिती प्रकल्प जळगाव जामोद मतदारसंघात उभारणी साठी प्रयत्नरत असणार आहे. असे आमदार डॉ.संजय कुटे यांनी प्रतिपादन सांगितले.
जळगाव जामोद व शेगाव येथे एमआयडीसी उभारण्या संदर्भात उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-