वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आद.अंजलीताई आंबेडकर व आद.महेशजी भारतीय सर यांच्या आदेशानुसार आद.सुताजदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हाध्यक्ष मोहितदादा दामोदर यांनी प्रशांत रमेश नाईक यांची जळगाव जामोद तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जळगाव जामोद तालुका कार्यकारिणी मध्ये 29 पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा, बहुजन, मुस्लिम, धनगर ,माळी, आदिवासी, OBC यांनी इतर वर्गातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चांगला उपक्रम जळगाव जामोद मध्ये जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केलेला आहे.जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी जोरदार कामाला सुरुवात केलेली असुन प्रशांत नाईक यांच्या नियुक्ती मुळे जळगाव जामोद तालुक्यामध्ये विद्यार्थी चळवळ गतिमान होणार आहे.वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन हे संघटन व भूमिका तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये चांगल्या कामातून पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही तालुक्यातील सर्व नवनिर्वचित पदाधिकारी करू अशी प्रतिक्रिया निवड केल्याबद्दल तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जळगाव जामोद तालुका कार्यकारिणी जाहीर..!तालुकाध्यक्ष पदी प्रशांत नाईक यांची निवड...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-