यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण..जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाला सुरुवात...


 शब्बीर खान/यावल...

  मराठा समाजाला आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ यावल तालुका सकल मराठा समाजाचे वतीने एक नोव्हेंबर 23 पासून यावल येथील भुसावळ टी पॉइंट जवळ साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तालुक्यातील समाज बांधव या ठिकाणी एकवटले असून साखळी उपोषण सुरू झाले आहे जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत यावलला उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय मराठा समाज बांधवांनी घेतला आहे.यावल शहरात भुसावळ टी पॉइंट येथे बुधवारी सकाळपासून मराठा आरक्षणाच्या मागणी करिता साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज रांगेत पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ यावल तालुक्यातील सखल मराठा समाज बांधव एकत्र आले आहे व त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे यासाठी उपोषणामध्ये जिल्हा परिषद चे माजी आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, सचिव अतुल यादव, प्रसिद्धी प्रमुख सुनील गावडे, डी. बी. पाटील, प्रा. मुकेश येवले, प्रा. संजय पाटील, प्रा. संजय कदम, विलास पवार, राकेश पाटील, स्वप्निल चव्हाण, भास्कर पाटील, किरण पाटील, दिनेश पाटील, एड. देवकांत पाटील,प्रा. मुकेश येवले, रणछोड पाटील, डॉ.हेमंत येवले, दिनकर क्षीरसागर,डी. सी. पाटील, राकेश पाटील, रुपेश पाटील, वसंत पाटील, किरण पाटील, अजय पाटील, अनिकेत येवले  मोठ्या संकेत सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले आहे जोपर्यंत मराठा समाजाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण कायम राहील असा पवित्रा यावल तालुका सकल मराठा समाज बांधवांनी घेतला आहे.-- आंदोलनस्थळी सौखेडासीम, दहीगाव, चुंचाळे, किनगाव, साकळी  मोहराळे, विरावली, आडगाव, उंटावद, नायगाव,येथील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Previous Post Next Post