मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या चालू असलेल्या आमरण उपोषणाला जळगाव जामोद तालुक्यातील सकल मराठा समाजाने समर्थन म्हणून चार दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण उपविभागीय कार्यालया समोर चालू केले होते.काल सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची उपोषण स्थळी भेट घेतली. शिष्टमंडळाशी जरांगे यांनी संवाद साधत २ जानेवारीची वेळ देत आमरण उपोषण मागे घेत साखळी उपोषण चालूच ठेवले आहे. जरांगे यांच्या आदेशाने जळगाव जामोद तालुक्यातील सकल मराठा समाजाने देखील मागण्या पुर्ण होईपर्यंत चालु असलेले बेमुदत साखळी उपोषणाला तूर्तास स्थगिती दिली आहे...! उपोषण स्थळी भजनसंध्या उपक्रम राबवून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून, तहसिलदार यांना निवेदन देऊन राष्ट्रगीताने उपोषणाची सांगता झाली. उपोषण स्थळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होता. यात महिलांची उपस्तीथी देखील लक्षणीय होती...!
सकल मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषणाला तूर्तास स्थगिती...राष्ट्रगीताने उपोषणाची सांगता...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-