शिक्षक सेना तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण वासुदेव भटकर यांना कामगार मसीहा मा. नारायण मेघाजी लोखंडे जीवन गौरव पुरस्कार प्रदान...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य यांच्या 6 व्या राज्य स्तरीय अधिवेशनात दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी  छत्रपती संभाजीनगर येथे  राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघ,राज्य शाखा महाराष्ट्र ही सर्व स्तरातील कर्मचारी यांच्यासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय ट्रेड युनियन   आहे.कर्मचारी आणि कामगार कल्याणसाठी कार्य करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार या युनियन च्या वतीने दरवर्षी केला जातो.सन 2023 या वर्षी,"कामगार मसीहा नारायण मेघाजी लोखंडे जीवन गौरव सन्मान पुरस्कारा साठी सम्पूर्ण राज्यभरातुन 8 व्यक्तींची निवड करण्यात आली होती.बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील  शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण वासुदेव भटकर  यांची एकमेव निवड झाली होती. श्रीकृष्ण भटकर सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी मेहनत घेतली आहे.तसेचअत्यंत कमी कालावधीत आपल्या कार्याच्या जोरावर संघटनेच्या माध्यमातून आपल्या सहकारी शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.सदर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मा डॉ मगन ससाणे,राष्ट्रीय अध्यक्ष IMPA नवी दिल्ली, यांचे हस्ते करण्यात आले.श्रीकृष्ण वासुदेव भटकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Previous Post Next Post