शिक्षक एक वर्ग एक ते आठ मुलांना शाळाच नाही. काला पांढरी चिखलदरा तालुक्याची घटना..मेळघाट मध्ये शिक्षण विभागाचा असाही गलथांनपणा.

राजु भास्करे अमरावती जिल्ह्य प्रतिनिधी..

चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम गाव कला पंढरी येथे जिल्हा परिषद जिल्हा परिषद विभागाचे उच्च माध्यमिक प्राथमिक मराठी शाळा गावात नावापूर्ती असून गेल्या तीन वर्षापासून या गावातील विद्यार्थी एका व्यक्तीच्या खाजगी घरात एकाच खोलीत बसत असल्याचे विदारक चिन्ह काटकुब जवळ काला पांढरी या गावात विदारक परिस्थिती आढळून आली.सविस्तर माहिती अशी की काटकोन चुरणे गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गट ग्रामपंचायत काला पांढरी हे गाव आहे या गावात गेल्या तीन वर्षांपूर्वी चक्रीवादळ आणि जिल्हा परिषद ची शाळा वर्ग एक ते आठ कोसळली होती तेव्हापासून या गावातील नागरिकांनी नवीन इमारतीची मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग अमरावती यांच्याकडे वारंवार इमारतीची मागणी केली होती परंतु शासनाने या ठिकाणी इमारत बांधली नसून दोन स्वच्छालय इमारत बांधली. व उर्वरित जागा ही खुली आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन हे उध्वस्त झाले आहे. आम्ही माहिती घेतली असता गावकऱ्यांनी सांगितले वर्ग एक ते आठ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता एक शिक्षक किंवा एक शिक्षिका ही कधीकाळी गावात फेरफटका मारली विद्यार्थ्यांचे कोणतेही वर्ग घेतल्या जात नाही गरीब विद्यार्थ्यांचे यात अतोनात नुकसान होत आहे.शिक्षण अधिकारी श्री माळवे यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की शाळेचा प्रस्ताव पाठवला असून तीनच शाळा जिल्हा परिषदे कडून मंजूर झाल्या त्यामध्ये गावाचं नाव आहे. परंतु बांधकाम कधी होणार हे सांगता येणार नाही त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाची खेळ नाही का असा प्रश्न चिखलदरा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. अशा अनेक शाळा आहेत त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहत नाहीत .परंतु नेहमीप्रमाणे त्यांचा पगार हा संबंधित शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कमिशन घेऊन काढत असल्याचेही शुद्ध नागरिकाकडून ऐकायला मिळाले. काला पांढरी येथील शाळेची पाहून शरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही कुंभकर्णी झोपेत असलेले जिल्हा परिषद अमरावती चे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी बहिऱ्याचे सॉंग व आंधळेपणा अशा प्रकारचे नौटंकी करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता तरी शिक्षण विभागाने जागे होऊन काला पांढरी येथील शाळेची इमारत उभी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे येणाऱ्या काळात यांना नेत्यांना व शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना खुर्ची खाली करून शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना  खुर्च्या खाली करू असा इशारा  गावातील महिलांनी व पालकांनी दिला आहे..


Previous Post Next Post