अखेर बोर्डी ग्रामपंचायतची अपील आयुक्त कार्यालयाने फेटाळली...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी यांनी गावात केलेल्या विकास कामाची लेखी तक्रार करण्यात आली होती.त्याची जिल्हाधिकारी अकोला यांनी दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अकोट यांना चौकशीचे आदेश दिले होते.त्या वरून उपविभागीय अधिकारी अकोट यांनी प्रकरण सुरू करून 1 वर्ष कसून चौकशी केली व गैरअर्जदार 1 ते 6 यांना आपली बाजु मांडण्याची संधी दिली.शेवटी गौनखनिज प्रकरणात उपविभागीय अधिकारी अकोट यांनी दि.1/3/2016 रोजी 25 लक्ष रुपये गैरअर्जदार 1 ते 6 यांना दंड केला होता.व गैर अर्जदार यांना दंडाच्या नोटिसेस बजावून सदर दंड सात दिवसाच्या आत शासकीय खजिन्यात भरण्याचे कडक आदेश दिले होते.त्या दंडाच्या आदेशा विरुद्ध ग्रामपंचायत सरपंच,सचिव,बोर्डी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे अपील केस दाखल केली होती.अप्पर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा एक वर्ष प्रकरण चालवून गैर अर्जदार यांना मत मांडण्याची संधी देऊन शेवटी दि.28/6/2018 रोजी ग्रामपंचायत बोर्डी यांनी केलेली अपील केस खारीज करून उपविभागीय अधिकारी अकोट यांचा दंडाचा आदेश कायम ठेवला होता.ग्रामपंचायत बोर्डी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे आदेशा विरुद्ध पुन्हा आयुक्त कार्यालय अमरावती येथे अपील प्रकरण दाखल केले.तिथे सुद्धा जवळजवळ दोनवर्ष प्रकरण चालले.व शेवटी आयुक्त कार्यालय अमरावती यांनि ग्रामपंचायत बोर्डी यांनी केलेली अपील खारीज करून उपविभागीय अधिकारी अकोट,व अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांनी पारित केलेला दंडाचा आदेश कायम ठेवला व प्रकरण आकोट तहसीलदार यांचेकडे वसुली करीता पाठवले.आकोटचे तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामपंचायत बोर्डी गौनखनिज दंड प्रकरणात गैर अर्जदार 1 ते 6 यांना समपहरण नोटीस बजावली असून पंधरा दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे.त्यामुळे आता ग्रामपंचायत दंड प्रकरणात आकोटचे तहसीलदार हे गैरअर्जदार यांच्याविरुद्ध नेमकी कुठली कारवाई करतात याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.