संततधार पावसामुळे पिके पाण्याखाली जाऊन सडण्याच्या मार्गावर शेतकरी अडचणीत..चोहोट्टा बाजार व कुटासा महसूल मंडळ ओला दुष्काळ जाहीर करावा,पुर्णाजी खोडके..
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
चोहोट्टा बाजार, तालुक्यासह चोहोट्टा बाजार कुटासा महसूल मंडळात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. या संततधार पावसामुळे काही शेतकऱ्यांची पाणी थांबलेल्या ठिकाणची पिके सुद्धा जाळली आहेत. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .म्हणून तालुक्या सह चोहोट्टा बाजार कुटासा महसूल मंडळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवा पुर्णाजी खोडके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आक्रमक होऊन मागणी केली आहे.व शेतकरयांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत शासनाने जाहीर करावा.अशी मागणी केली आहे.. यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी बांधव उपस्थित होते.....