काँग्रेस सेवादल चे घरकुल लाभार्थ्यांच्या विविध मागण्या व विविध समस्याबाबत नगरपरिषदेला दिले निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी काँग्रेस सेवादल जळगांव जामोद यांच्या तर्फे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेल्या टप्प्यांचे अनुदान 15 ऑगस्ट 2024 पूर्वी देण्यात यावे व बांधकाम परवानगीची रक्कम नगदी न घेता देय अनुदानातून कपात करण्यात यावी, शहरातील वस्त्यांची व लोकसंख्येची झालेली वाढ पाहता उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांची संख्या अपुरी असून वाढीव अंगणवाड्या निर्माण करण्यात याव्यात,पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे व्यवस्थित न झाल्याने अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे तसेच शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले असून रोगराईचे प्रमाण वाढत आहे तरी नाल्या,नाले व सफाईची कामे नियमित आणि व्यवस्थित करण्यात यावीत तसेच शहरात डासांचे निर्मूलन करण्यासाठी निर्जंतुकीकरण धुर फवारणी करण्यात यावी, पथदिवे व हायमास्ट पोल वरील लाईट भर दिवसा सुरू असतात त्यामुळे विजेचा अपव्यय होऊन त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो म्हणून पथदिवे व हायमास्ट लाईट नियमितपणे चालू बंद करण्यात यावेत, शहरातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी,विधवा व परित्यक्ता महिला तसेच अपंग व निराधार नागरिकांकरिता सामाजिक दायित्व म्हणून न प कार्यालयात स्वतंत्र मदत केंद्र सुरू करण्यात यावे व त्याची प्रसिद्धी करण्यात यावी, कमिशन खोरीच्या नादात नगर परिषदेच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून विकास कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून यासंबंधी गांभीर्याने घेऊन दोषींवर कारवाई यावी. उपरोक्त सर्व मागण्या 15 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस सेवादलच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार व शहराध्यक्ष शेख अन्सार बाबूसाहेब यांच्यातर्फे व डॉ. संदीप वाकेकर,अर्जुन घोलप, ओ.पी.तायडे, देविदास इंगळे, अब्दुल जहीर, अयाज पुणेवाले, जुनेद शेख,नारायण काळपांडे,किसन धूर्डे,दिनेश काटकर, रहमत उल्ला खान, शेख साजिद,शेख हबीब, व इतर असंख्य नागरिक यांच्या सह्यानिशी देण्यात आले.