मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस ही असेल पात्रता..गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे...


 
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस ही असेल पात्रता..गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी -

सध्या राज्यामध्ये पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र असलेले जवळपास 52 लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

एका कुटुंबात एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कशाप्रकारे करणार अर्ज.?

या योजनेसाठी पंतप्रधान उज्वला गॅस योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेमधील महिला पात्र ठरणार असल्यामुळे आपण आधीच यासाठी अर्ज भरलेला आहे असे देखील समजून घ्यावी. कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वच कुटुंबांनी अर्ज भरलेला आहे आणि जे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांना या योजनेचा ऑटोमॅटिक लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठेही अर्ज करण्याची गरज नाही.

कशा पद्धतीने लाभार्थ्यांना मिळेल लाभ.?

पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपनी अंतर्गत करण्यात येत असते. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळत असणाऱ्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वाटप सुद्ध तेल कंपन्या अंतर्गत करता येणार आहे.

पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत वाटप होणार आहे या सिलेंडरच्या बाजारभावाची सर्व रक्कम ग्राहकांकडून घेतली जात असते. त्यानंतर केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान उज्वला योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट गॅसधारकांच्या खात्यावर हस्तांतरित केली जात असते. त्याच पद्धतीने आता तेल कंपनीने राज्य सरकारकडून द्यायची 530 रुपये प्रति सिलेंडरचे रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे.

Previous Post Next Post