रखडलेली घरकुल अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी व इतर विविध मागण्यांकरिता शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शेख नशीर शेख रोशन यांनी दिले निवेदन...


 रखडलेली घरकुल अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी व इतर विविध मागण्यांकरिता शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शेख नशीर  शेख रोशन यांनी दिले निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी नगरपरिषद जळगाव जामोद चे मुख्याधिकारी यांना जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शेख नासीर शेख रोशन यांनी पंतप्रधान आवास योजनेतील  अनुदानाची रखडलेली रक्कम त्वरित देण्यात यावी,नगर परिषद जळगाव जामोद अंतर्गत शहरातील रस्ते नाले सफाई करण्यात यावी,जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, जी.एफ.सी. स्टार रेटिंग घंटागाडी साफसफाई आणि ग्रीन बेल्ट 50 मीटर डस्टबिन डे नाईट स्लीपिंग हे नियमित करण्यात यावे,तसेच बंद पडलेले पद दिवे लावण्यात यावे, ह्या विविध मागण्या 7 दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.ह्याच्या प्रतीलीपी मुख्यमंत्री व मा जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.निवेदनावर डॉ. संदीप वाकेकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव घुटे, मा नगरसेवक श्रीकृष्ण केदार,ऍड संदीप मानकर, इमरान खान,अमोल मानकर, हुसेन राही, सैयद शमीम, अयाज पूनेवाले, अब्दुल जहीर, सैयद तौफिक, शेख जुनेद, दिनेश काटकर, अमोल मानकर, मिलिंद वानखडे,अनिल इंगळे, धनंजय बोंबटकर,इमरान दौला, इमरान खान व असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post Next Post