आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण..बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात नविन आश्रम शाळा उभारण्यास शासनाची मान्यता !


 
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण..बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात नविन आश्रम शाळा उभारण्यास शासनाची मान्यता !

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी-

संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल सायखेडा येथे शाळा निर्मिती व इमारत बांधकाम करण्यासाठी 14.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामुळे पंचक्रोशीतील आदिवासी विद्यार्थ्यांना सायखेडा गावातच मिळणार दर्जेदार शिक्षण व राहण्याची उत्तम व्यवस्था.आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नातून  100 कोटि पेक्षा जास्त निधी मतदारसंघातील विकास कामा करिता मंजुर झाला आहे. या संदर्भात प्राप्त माहिती नुसार जुलै महिन्यात राज्य सरकार चे पावसाळी अधिवेशन पार पड़ले. या अधिवेशनात आ डॉ संजय कुटे यांनी आपल्या जळगाव जामोद मतदारसंघा करीता 100 कोटि पेक्षा जास्त निधी विविध विकास कामानकरिता खेचुन आणला आहे.यामध्ये आदिवासी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा  असा संग्रामपुर तालुक्यातील अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला आश्रम शाळेचा विषय मार्गी लागला.  सायखेड येथे आश्रम शाळा बांधकाम करणे साठी समारे 14 कोटि 50 लक्ष रूपये इतका निधी मंजुर करण्यात आला आहे. लवकर च टेंडर प्रक्रिया पुर्ण करुण कामाला सुरवात होणार आहे. या आश्रम शाळा मंजूरी मुळे संग्रामपुर तालुक्यातील शेंबा, सालवान, पिंगळी, रोहिणखिड़की, चुनखेड़ी, सायखेड यासह इतर आदिवासी गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.तसेच राज्य महामार्ग बांधनी व विस्तारिकरना साठी 23 कोटि रूपये,संग्रामपुर येथे महसूल ईमारत बांधकामा साठी 3 कोटि रूपये, संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ते बांधकाम व पुल निर्मिती करीता 25 कोटि रूपये तर जळगाव जामोद, संग्रामपुर व शेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पुल बांधकाम करणे साठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तब्बल 50 कोटि इतका निधी मंजुर झाला आहे. या अंतर्गत प्रजिमा-49 ते गोळेगांव बु. खु. ता शेगांव, भींगारा ते गहुमाल, पिम्परी आडगांव, वड़गांव वान ते तालुका हद्द, सावळी रस्ता, सावळा रस्ता, टाकळी पंच रस्ता, मालठाना रस्ता व चालठाना रस्ता इत्यादि महत्वाचे रस्ते बांधकाम करण्यात येतील.

-----------

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात संग्रामपुर व जळगाव जामोद तालुक्यातील डोंगराळ परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या समस्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्या पैकी अनेक प्रश्न मार्गी लागले असुन मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजुर झाला आहे. दोन्ही तालुक्यात जननायक भगवान बिरसा मुंडा स्मारक निर्मिती,डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत आदिवासी भागाचा समावेश व सायखेड आश्रम शाळा निर्मिती ह्या बाबी माझ्या साठी समाधाना ची बाब आहे. - आ डॉ संजय कुटे

Previous Post Next Post