आर्ट ऑफ लिविंग चे आनंद अनुभूती शिबिर दिनांक 20 ते 24 ऑक्टोंबर रोजी जळगाव व जामोद येथे होणार संपन्न..‌.


 
आर्ट ऑफ लिविंग चे आनंद अनुभूती शिबिर दिनांक 20 ते 24 ऑक्टोंबर रोजी जळगाव व जामोद येथे होणार संपन्न..‌.

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

 आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक परमपूज्य  श्री श्री रविशंकर जी यांचे कृपा आशीर्वादाने जामोद आणि जळगाव जामोद येथे आर्ट ऑफ लिविंग चे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिविंग ची जगविख्यात अशी सुदर्शन क्रिया शिकविल्या जाणार आहे. या शिबिराला प्रशिक्षक म्हणून अमरावती येथील वरिष्ठ प्रशिक्षक संजय भैय्या गाडेकर यांचे सानिध्य लाभणार आहे. सुदर्शन क्रियेचा अनुभव जगातील 175 पेक्षा जास्त देशातील लोकांनी घेतलेला आहे.सुदर्शन क्रिया जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त आहे. तणाव रहित मन,आरोग्य संपन्नता,निर्णय क्षमता,तरुणांना अभ्यासामध्ये एकाग्रता,आंतरिक शक्तीचा अनुभव स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तसेच बऱ्याचशा आजारातून बाहेर निघण्यासाठी सुदर्शन क्रियेचा फायदा झालेला आढळून आलेला आहे. जामोद येथे दिनांक 20 ते 24 ऑक्टोंबर सकाळी पाच ते आठ या वेळेत बारी समाज मंगल भवन येथे होणार आहे आणि दिनांक 19 ते 23 ऑक्टोंबर संध्याकाळी सहा ते नऊ जनकल्याण टॉवर,माँ दुर्गा चौक,जळगाव जामोद येथे होणार आहे अधिक माहितीसाठी गणेश धुर्डे सर 9921850387, आरती ताई उमाळे 7507029555 यांच्याशी संपर्क करावा असे आर्ट ऑफ लिविंग चे जळगाव जामोद येथील प्रशिक्षक निलेश तायडे यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post