शिवसेनेच्या वतीने अकोट येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ना नफा ना तोटा या तत्वावर तशेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण व २० राजकारण या धोरणावर रुग्णवाहिका सुरू केली या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ.नितीनबाप्पू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.आ.गजाननराव दाळु गुरुजी,शिवसेना जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर,मा.आ.संजय गावंडे,मा.आ.हरिदासजी भदे,सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड उपस्थित होते,समाजकारणाचा लहानपणापासून वसा असलेले दिलीप बोचे यांनी यापूर्वी देखील सर्वसामान्यांनसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत त्याचप्रमाणे अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यास त्या रुग्णाला रुग्णवाहिकेची सेवा मोफत असेल व ती रुग्णवाहिकेत सर्व सोयीसुविधा असेल या रुग्णवाहिलेच्या लोकार्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख विकास पागृत,योगेश्वर वानखडे,शहरप्रमुख राजेश मिश्रा,राहुल कराळे,तालुकाप्रमुख नितीन ताथोड,ज्ञानेश्वर म्हैसने,अंकुश कुलट यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
