आ अँड आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्यामुळे रोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा वनवास संपला..आठ हजार रुपये मिळणार मानधन, आ अँड फुंडकर यांचा केला भव्य सत्कार...
सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
आ अँड आकाश फुंडकर यांचे स्वतःच्या पाठपुराला मोठे यश प्राप्त झाले असून रोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा वनवास अखेर संपला व त्यांना तब्बल दरमहा 8000 रुपयांचे मानधन राज्य सरकारने जाहीर केले. राज्यातील रोजगार सेवक हे ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये महत्त्वाची भूमिका अनेक वर्षापासून बजावत आहेत. परंतु त्यांना दरमहा ठोस असे मानधन नव्हते. आतापर्यंत टक्केवारीनुसार त्यांना तोकडे पैसे मिळत असत. रोजगार सेवकांनी महिन्याला सरकारने मानधन जाहीर करावे यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला आ अँड आकाश फुंडकर यांनी नेहमी पाठिंबा दिला. व त्यांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला तसेच रोजगार सेवकांच्या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाले. राज्य सरकारने रोजगार सेवक यांना दरमहा 8000 रुपये मानधन देण्याचे आदेश जाहीर केले. यामुळे गेल्या 17 वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढत असलेल्या रोजगार सेवकांचा वनवास अखेर संपला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा हातभार लागला असून यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना अधिक गती प्राप्त होईल असे प्रतिक्रिया यावेळी आमदार अँड आकाश फुंडकर यांनी दिली. तसेच राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे रोजगार सेवक संघटनेच्या वतीने स्थानिक भाजपा करण्यात आ अँड आकाश फुंडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रोजगार संघटनेचे खामगाव तालुका अध्यक्ष राजेश खंडेराव, उपाध्यक्ष अनिल वाकोडे, सचिव गजानन सावळे, सहसचिव नारायण शेळके, पदाधिकारी गजानन सकळकळे ,भीमराव हिवराळे ,पवन डवंगे, महादेव इंगळे, माजी तालुकाध्यक्ष दिनेश कस्तुरे, जिल्हा संपर्कप्रमुख ज्योतीराम इंगळे ,संजय गायकवाड ,मंगेश वानखडे, आदी पदाधिकारी तसेच भाजपाचे नेते छगन राठोड ,युवराज मोरे, वसंतराव वानखडे ,उमेश ढोन आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आ अँड आकाश फुंडकर यांचे सह राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना .देवेंद्रजी फडवणीस, ना.अजित दादा पवार, व रोजगार हमी योजनेचे मंत्री दादासाहेब भुसे यांचे मनोभावे आभार मानले.
.jpg)