दहेंद्री येथील महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप.नारे देऊन सरपंच सचिवावर काढला रोष. पाण्यासाठी महिलांची पायपीट..


 
दहेंद्री  येथील महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप.नारे देऊन सरपंच सचिवावर काढला रोष. पाण्यासाठी महिलांची पायपीट..

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री हे गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये दहेन्द्री दहेंद्रीडांना व कोटमी  या तीन गावा मिळून 4 वार्ड आहेत व ग्रामपंचायत सदस्य संख्या 11 आहे ही ग्रामपंचायत नेहमी वादाच्या भोवऱ्यात  असते. या ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षापासून कोणताही सरपंच किंवा उपसरपंच यांनी आपला पूर्ण कार्यकाळ बघितलेला नाही. त्याच कारणाने येथील सरपंच सचिव यांचे ग्रामपंचायत कडे लक्ष  नाही. सचिव तर पंधरा पंधरा दिवस येत नाही आला तर अर्ध्या तासात निघून जातो आणि कोणाचे कामे सुद्धा करत नाही. दहेन्द्री गावातील मुख्य पाईपलाईन फुटल्याने पंधरा दिवसापासून गावात पाणी येत नसल्याने महिलांनी एकजूटता दाखवून ग्रामपंचायत समोर नारे देऊन ग्रामपंचायतला ताला ठोकला.सरपंच सचिवांना वारंवार फोन काम होत नाही. सरपंच हे सांगतात की आज किंवा उद्या होईल असे करून पंधरा दिवसापासून असे उत्तरे देत आहेत. सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायतला ताला ठोकण्यात आला. दीड महिना पहिले दहेन्द्रीडाना साथीच्या रोगाची लागण झाली होती आताही हातपंपाच्या पाण्यात मातीचे कण व दूषित पाणी येत आहे. असे महिलांचे म्हणणे आहे. जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत त्याला काढणार नाही असे अनेक महिलांच्या प्रतिक्रिया  आहे..

Previous Post Next Post