भाजपाचा जलेबी वाटून हरियाणा विजयाचा जोरदार जल्लोष, फटाक्यांची भव्य आतिषबाजी..विजयाचे हेच चित्र महाराष्ट्र व झारखंडमध्ये दिसेल - आ अँड आकाश फुंडकर...


भाजपाचा जलेबी वाटून हरियाणा विजयाचा जोरदार जल्लोष, फटाक्यांची भव्य आतिषबाजी..विजयाचे हेच चित्र महाराष्ट्र व झारखंडमध्ये दिसेल - आ अँड आकाश फुंडकर...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

हरियाणा विधानसभा विजयाचा खामगाव भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची भव्य आतिषबाजी करीत जलेबी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.स्थानिक गांधी चौकात रात्री नऊ वाजता आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. तसेच आमदार अँड आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना जलेबी भरवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी ढोल ताशाच्या गजरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नाचत जल्लोष केला. यावेळी भाजपा सोशल मीडिया  महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सागरदादा फुंडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव तथा खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, प्रसिद्ध उद्योजक संतोष डिडवाणी,राजेश झापर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष विलास काळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तसेच खामगाव जिल्हा प्रभारी राम मिश्रा, माजी उपनगराध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, खामगाव विधानसभा युवा मोर्चा संयोजक पवन गरड, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राज पाटील, शहराध्यक्ष शुभम देशमुख, कृष्णा ठाकूर, गोपाल पंडाजी दिलीप गुप्ता ,प्रसाद यलाबादकर, गोलू आमले ,गोलू आळशी, संजय भागदेवानी, बंटी खंडेलवाल, शशांक वक्ते, रुपेश शर्मा, आशिष सुरेका, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post