जळगाव जामोद मतदारसंघाला अनमोल दिवाळी भेट !आमदार संजय कुटे यांच्या मागणीला यश.आयुर्वेद महाविद्यालय उभारणीसाठी ४८७ कोटी रुपयांचा भरघोस निधीला मान्यता !


 
जळगाव जामोद मतदारसंघाला अनमोल दिवाळी भेट !आमदार संजय कुटे यांच्या मागणीला यश.आयुर्वेद महाविद्यालय उभारणीसाठी ४८७ कोटी रुपयांचा भरघोस निधीला मान्यता !

जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित 100 खाटांचे रुग्णालय शासन निर्णय क्रमांक ए एमसी-२०२४/ प्र. क्र. 671/24/शिक्षण-1 दिनांक 9 ऑक्टोबर 2024 नुसार मंजूर झाले आहे.जळगाव जामोद मतदारसंघात वैद्यकीय सेवा व शिक्षणाची पायाभूत सेवा निर्माण व्हावी म्हणून बऱ्याच दिवसांपासून आपण प्रयत्न करत होतो त्यानुसार आपले खासदार आणि देशाचे केंद्रीय आयुष्य व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी करून मतदार संघात 100 विद्यार्थी संख्येचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न 100 खाटांचे क्षमता असलेले रुग्णालय मंजूर करून घेतले आहे.नवीन महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील 127 व वर्ग 4 ची कंत्राटी 71 व इतर 101 अशी एकूण 299 पदे व रुग्णालयाकरिता  संवर्गातील 182 व कंत्राटी वर्ग 4 ची 113 व इतर अशी एकूण 297 पदांची नवनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार NCISM मानांकनानुसार पद निर्मिती व बांधकाम यंत्रसामग्री , देखभाल व आवर्ती खर्चालाही एकूण 487.03 कोटी रुपयांच्या भरीव निधीस मान्यता देण्यात आली आहे.सातपुड्याच्या माध्यमातून नैसर्गिक वनौषधीने संपन्न असलेल्या या भागात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवनिर्मितीने मतदारसंघ रोजगार निर्मिती सोबतच शैक्षणिक व आरोग्य संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयास मंजुरात मिळून दिल्याबद्दल मतदारसंघातील जनता वैद्यकीय शिक्षण संपन्नेकडे होत असलेली वाटचाल अनुभवणार असून समाधान व्यक्त करत आहे !

Previous Post Next Post