अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहीलदारांना निवेदन...


 
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहीलदारांना निवेदन...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

महाराष्ट्र राज्यातील आकोट तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीचा दाखला,राशन कार्ड,आधार कार्ड,मतदान कार्ड,त्यांचेकडे कुठलेच कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना वरील प्रमाणपत्र मिळणे करीता जिल्हास्तरावर विषेश अभियान राबवा.आकोट तालुक्यातील कासोद,शिवपुर,रामापुर,दहिखेड,पोपटखेड,केलपाणी,राहणापुर,या परिसरात भटक्या विमुक्त जाती जमाती मधील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आज पर्यत त्यांना राशन कार्ड,मतदान कार्ड,जातीचा दाखला,आधार कार्ड,इत्यादी प्रमाणपत्र त्यांचे कडे उपलब्ध नाहीत.वरील प्रमाणपत्र मिळणे करीता त्यांनी वारंवार प्रयत्न केले असता त्यांचेकडे त्यांचे जन्म प्रमाणपत्र,जातीचा पुरावा,ते भटके जीवन जगत असल्याने त्यांचे कडे उपलब्ध नाही.त्यामुळे ते सादर करु शकत नाहीत त्याकरणाने त्यांना वरील प्रमाणपत्र मिळत नाहीत त्यामुळे या समाजातील लोक,मुले,मुली,विद्यार्थी शासनाच्या अनेक योजना पासुन वंचीत राहत आहेत.त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आज पर्यंत मिळालेला नाही.या समाजातील लोक ज्या जागेवर राहत आहेत ती जागा त्यांचे नावे नाही.त्यामुळे ते ज्या शासनाच्या जागेवर आज रोजी राहत आहेत ती जागा शासनाच्या नियमा प्रमाणे नियमाकुल करुन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.तरी विनंती की भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीचा दाखला,राशन कार्ड,आधार कार्ड,मतदान कार्ड,त्यांचेकडे कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना वरील प्रमाणपत्र मिळणे करीता जिल्हास्तरावर विषेश अभियान राबविण्यात यावे.य बाबत अकोट तहीलदार यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी अशोक अमानकर,प्रशांत पाचडे,गजानन डाफे,सुभाष मोहिते,सुनील गेबड,जावेद पटेल,हिरालाल कासदेकर,डॉ.अनिल वरणकार,अनुप भाऊ,यांच्यासह बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post