बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत अकोला परिमंडळामधील बुलढाणा मंडळांतर्गत खामगाव विभागामध्ये सध्याच्या शेगांव उपविभागातील शेगाव शहर वितरण केंद्र व शेगाव ग्रामीण वितरण केंद्र यांची पुनर्रचना करुन अनुक्रमे नवनिर्मित श्री. संत गजानन महाराज वितरण केंद्र व मनसगांव वितरण केंद्र निर्माण करण्यास मंजूरात मिळाल्याची माहिती आ डाॅ संजय कुटे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी सेवाविनियम २००५ नुसार मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांनी शाखा कार्यालये व पद स्थापनेला मंजूरी दिली आहे.सध्याच्या शेगांव उपविभाग अंतर्गत पुनर्रचनेनंतर शेगाव शहर वितरण केंद्र, शेगाव ग्रामीण वितरण केंद्र व अनुक्रमे नवनिर्मित श्री. संत गजानन महाराज वितरण केंद्र व मनसगांव वितरण केंद्र अशी एकूण ०४ शाखा कार्यालये राहतील.
______________________________
@ महावितरण अंतर्गत शेगाव शहर व ग्रामीण वितरण केंद्राचे पुनर्रचना करून नवनिर्मित श्री संत गजानन महाराज वितरण केंद्र व मनसगांव वितरण केंद्रास मान्यता मिळाली असून पदनिर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे.शेगाव उपविभागात चार शाखा कार्यालये होणार असल्याने वितरण व्यवस्था सोयीची होईल. शहर व ग्रामीण ग्राहकांना सेवा देणे सोयीचे होईल..
- अजयसिंह मोहता
- उपकार्यकारी अभियंता
- महावितरण उपविभाग शेगाव
