जळगाव जा. मतदार संघात आ.डॉ. संजय कुटे यांच्या विकास कामांचा झंझावात...7650 कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न...


 
जळगाव जा. मतदार संघात आ.डॉ. संजय कुटे यांच्या विकास कामांचा झंझावात...7650 कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन  व लोकार्पण सोहळा संपन्न...

राजेश बाठे-संपादक आर सी २४ न्युज....

जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी कोट्यावधीचा विकास निधी खेचून आणून मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू केला आहे. आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी मतदार संघामध्ये 7650 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.यामध्ये 300 कोटीचे करणवाडी ते पिंपळगांव व जळगांव जामोद ते सोनाळा ते जिल्हा सिमेपर्यंत 40 किमी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यानंतर जिगाव प्रकल्पस्थळी 3060 कोटीच्या जिगाव प्रकल्पाच्या नदीपात्रातील सांडव्याचे बांधकाम, वक्रद्वारे निर्मिती, उभारणीची व्यवस्था व इतर अनुषांगिक कामे, उपसा सिंचन योजना क्र. 2, 3, 5, 7 व 8 च्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व वितरण व्यवस्था, स्थापत्य कामे व इतर संलग्न कामे तसेच 200 कोटीच्या जिगांव प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. 7 मधील बांधकामे जिगांव प्रकल्पांतर्गत जळगांव जामोद मतदारसंघातील मौजे. भोन, अडोळ खुर्द, अडोळ बुद्रुक (पळशीघाट), अडोळ बुद्रुक (पळशीफाटा), गोळेगांव खुर्द, हिंगणा बाळापूर, माहुली, गौलखेड, भोटा या गांवांची पुनर्वसन कामे व  कालखेड फाटा येथे 200 कोटीच्या तरोडा डी-येऊलखेड - कालखेड - पाडसुळ ते पाडसुळ फाटा आणि मनसगांव - गोळेगांव बु., पाडसुळ, पाळोदी झाडेगांव फाटा - मानेगांव रा.मा. 24 चारमोरी शेगांव पर्यंत रस्ता बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. 191 कोटीच्या चोंढी सिंचन प्रकल्पाचा जलपूजन सोहळा व बंद नलिका वितरण प्रणाली चा लोकार्पण सोहळा. 211 कोटीच्या जळगांव जामोद मतदार संघासाठी 150 गांव पाणीपुरवठा योजना (रेट्रो फिटींग) चे निरिक्षण. टुनकी येथे 750 कोटीच्या  राज्य महामार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते व पुल आणि प्रशासकिय इमारत बांधकाम करणे व करमोडा येथे 147 कोटीच्या   दयालनगर-करमोडा - पळशी - संग्रामपुर - बोडखा - कवठळ - भोन 35 कि.मी. रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच जळगांव जामोद तालुक्यातील मौजे वायाळ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय व संलग्नित 100 रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय मंजुर झाले असून महाविद्यालय व रुग्णालय स्थापनेचा एकुण खर्च 487 कोटी असून 25 एकर जागेत महाविद्यालयाची व रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विविध संवतर्गातील 596 पदे मंजूर झाली आहेत. याशिवाय जळगांव जामोद मतदार संघासाठी नावीण्यपुर्ण प्रकल्पांची निर्मिती होत आहे. यामध्ये वारी हनुमान येथे भाविक भक्तांची सोय होण्यासाठी वाण नदीवर थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी 10 कोटीच्या विशेष पुलाची निर्मिती. जळगांव जामोद शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन बस स्थानक ते शाळा व कॉलेजेस पर्यंत 10 कोटीच्या पादचारी पुलाचे (स्कायवॉक) निर्माण, जळगांव जामोद, संग्रामपूर व शेगांव तालुक्यात 13 ठिकाणी सोलर फिडरव्दारे विज निर्मीती करून शेतकऱ्यांना मुबलक विजेचा पुरवठा उर्जा विभागाव्दारे करुन देण्यासाठी 250 कोटीचा सोलर उर्जा प्रकल्प. जळगांव जामोद येथे 80 कोटी खर्चाचे 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे व रुग्ण सेवेकरीता आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा निर्माण करणे.नगर विकास योजने अंतर्गत शेगाव शहर, जळगाव जामोद शहर व संग्रामपुर नगर पंचायत अंतर्गत 100 कोटींपेक्षा जास्त किमतीची पायाभूत सुविधा करणारी व शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी इमारत, रस्ते, पुल, चौक सौंदर्यीकरण, सिसीटीव्ही, विद्युत पोल, रेल्वे अंडरपास, स्कायवॉक, वाचनालय, स्मशानभूमि सौंदर्यीकरण व्यायाम शाळा, शाळा बांधकाम इत्यादी कामे प्रगतीपथावर असुन या कामांमुळे हि गावे स्मार्ट सिटी म्हणुन ओळखल्या जावु लागली आहे. जलजिवन मिशन अंतर्गत 747 कोटीची शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत जळगांव जामोद मतदार संघातील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे या करीता मोठ्या प्रमाणात योजना राबविण्याचे नियोजन केले असुन. सर्व योजनांची कामे अतिशय जलदगतीने होत आहेत. जळगांव जामोद शहर व 150 गावे प्रादेशिक पाणपुरवठा योजना (रेट्रो फिटींग) या योजने अंतर्गत मुख्य उंच टाकीपासुन 150 गावातील उंच पाण्याच्या टाकीपर्यंत. 202 कि.मी. लांबीचे नेटवर्क, 150 गावातील वितरण व्यवस्थेकरीता 432 कि.मी. लांबीचे पाईपलाईन नेटवर्क, पाच मुख्य संतुलन उंच टाकीचे बांकधाम व गावातील 90 उंच पाण्याच्या टाकीचे बांधकाम. याशिवाय हर घर जल योजनेअंतर्गत  150 गांव पाणीपुरवठा योजना (रेट्रो फिटींग) 211 कोटी, राजुरा व 8 गांव पाणीपुरवठा योजना 14 कोटी, निमखेडी व 9 गांव पाणीपुरवठा योजना 13 कोटी,  चिंचोली व 30 गांव पाणीपुरवठा योजना 88 कोटी, 30 गांवे ता. शेगांव पाणीपुरवठा योजना 63 कोटी, पुनर्वसीत गावठाणाकरीता 10 गांव पा.पु. योजना. 34 कोटी, अमृत 2.0 अंतर्गत शेगांव शहरासाठी वाढीव पा.पु. योजना 165 कोटी, महानगरोत्थान अंतर्गत संग्रामपुर शहरासाठी वाढीव पा.पु. योजना 12 कोटी, अमृत 2.0 अंतर्गत जळगांव जामोद शहरासाठी वाढीव पा.पु. योजना. 22 कोटी व शेगांव शहराकरीता मलनिस्सारण प्रकल्प 125 कोटी.

__________________________________

पर्यटन - गोडाळा धरण येथे जलपर्यटन निर्मिती करणे (5 कोटी,) - मौजे गोडाळा डॅम येथे जलपर्यटन निर्मिती करणे. बोट, फ्लोटींग जेट्टी व इतर अनुषांगीक कामे. - गोडाळा डॅम येथे जलपर्यटकांकरीता सोयीसुविधा उपलब्ध करणे. कॅफेटेरिया स्वच्छतागृह,पार्कींग, गजिबो,सुशोभिकरण, चैनलिंग फॅन्सींग व इतर अनुषांगिक कामे. 100 कोटी निधीतुन अंबाबरवा येथे निसर्ग पर्यटन, वन्यजीव संकुल व अभ्यागत केंद्र उभारणे. या प्रकल्पा करीताप्रकल्प सल्लागार नियुक्त करणे. (02 कोटी), भव्य रस्ते,पुल व इमारत निर्मीतीसाठी 750 कोटी रुपये. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्वाचे सिंचन प्रकल्प 15000 कोटी रुपयांची महत्वाकांक्षी जिगांव प्रकल्पाला सुप्रमा प्राप्त. यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे गावठाण पुर्नवसन व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्याकरीता वितरण व्यवस्थेचे काम जलदगतीने सुरू. 506 कोटी रुपयांची अटकचेरी सिंचन प्रकल्पाला सुप्रमा प्राप्त. (1168 हेक्टर सिंचन क्षमता), 128 कोटी रुपयांची अटकचेरी प्रकल्पाला सुप्रमा प्राप्त. (750 हेक्टर सिंचन क्षमता), 200 कोटी रुपयांची कुऱ्हा - वडोदा-इस्लामपुर उपसा सिंचन योजनेला सुप्रमा प्राप्त. 91 कोटीचा चोंढी प्रकल्प पुर्ण. रेल्वे प्रकल्प 2100 कोटी रुपये-सोनाळा व जामोद येथे रेल्वे स्टेशन निर्मितीसह तुकईथड पर्यंत 9 कि.मी.च्या रेल्वे बोगद्याची निर्मिती करण्या करीता अकोट-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेसाठी जमिन भुसंपादन प्रक्रिया अंतिम टप्पयात आहे. अशाप्रकारे आ. डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नाने मतदार संघात विकासाची गंगा वाहत आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, जिल्हा सरचिटणीस  डॉ गणेश दातीर, राजेंद्र गांधी, गुणवंतराव कपले,चंदाताई पुडे, डॉ किशोर केला, रंगराव देशमुख,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, प्रकाश वाघ भाजपा तालुका अध्यक्ष जळगाव , निलेश शर्मा,लोकेश राठी  भाजपा तालुका अध्यक्ष संग्रामपुर, राजेंद्र हेलगे भाजपा तालुका अध्यक्ष शेगाव ,कैलास पाटील, यासह सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव, जळगाव जामोद,शेगाव, येथील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच महायुतीचे  पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोच्या  संख्येने नागरिक उपस्थित होते.             

___________________________________

शिक्षण, सिंचन, रस्ते, रेल्वे, पर्यटन या सर्वांच्या जोरावर  जळगाव जामोद मतदारसंघ महाराष्ट्रातील एक नंबरचा मतदार संघ  येणाऱ्या येणाऱ्या पाच वर्षात बनवनार आमदार संजय श्रीराम  कुटे

Previous Post Next Post