अवैद्य गोवंश वाहतूकदारांना १,५१,२०० रु रक्कम खावटी भरण्याचा आदेश..न्यायदंडाधिकारी संग्रामपूर न्यायालयाचा आदेश...
अनिल भगत/ बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
पोलिस स्टेशन तांमगाव यांनी दि. २५/०७/२०२४ रोजी क्राइम नंबर २३८/२४ नुसार बी एन एस कायद्याचे कलम २८१,३ (५) सहकलम ५ (a), बी, ९, तसेच महाराष्ट्र पशू अधिनियम कलम ११(३) नुसार दाखल गुन्ह्यात ८ गोवंश (ज्यात १ गाय व ७ वासरी) अवैद्य वाहतूक करताना चार चाकी वाहन तसेच सदर वाहणांस रस्ता दाखवणारी मोटरसायकल गोवंशासह जप्त केली होती.सदर वाहन मालकांनी त्यांची वाहने सुपूर्तनाम्यावर मिळण्याकरीता न्यायदंडाधिकारी संग्रामपूर न्यायालयात अर्ज केला होता. सदर प्रकरणांत न्यायालयाने गोवंश प्रत्यक्ष ताब्यात असणा-या कृष्णाई गोशाळा जामोद यांना त्यांचे म्हणने (से)मांडण्याकरीता नोटीस काढली.कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल हे हजर झाले व त्यांनी वकिला मार्फत त्यांचे म्हणने सादर केले. प्रकरणांत सरकारी वकील तसेच गोशाळेचे वकील यांनी वाहने सुपुर्तनाम्यावर देण्याबाबत विरोध दर्शवुन गोवंशाचा दैनंदिन खर्च वाहन धारकांकडुन वसुल करण्याचा युक्तीवाद केला. सदर गुन्हास गोवंश तस्करी करणा-या बरोबरच वाहन धारकांची सुध्दा संयुक्त रीत्या जबाबदारी आहे असे सांगितले.न्यायालयाने सरकारी वकील, अर्जदारांचे वकील तसेच गोशाळेचे वकील यांचा युक्तीवाद, कायदेशीर तरतुदी तसेच उच्चतम न्यायालयाचे न्यायनिवाडे या सर्वांचे अवलोकन करुन प्रत्यक्ष घटना तारखेपासुन ते वाहन ताब्यात मिळेपर्यंत अशी एकुण १,५१,२०० रु. खावटी खर्च कृष्णाई गोशाळेला दयावा तसेच प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत दररोज २४०० रु. खावटी प्रमाणे खावटी खर्च दयावा असा आदेश दि.२६/९/२०२४ रोजी पारीत केला. आदेशाची पुर्तता केल्याशिवाय वाहने सोडण्यात येवु नये असे आदेशांत नमुद केले.प्रकरणांत सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड. राहाणे व गोशाळेतर्फे अँड गणेश क्षीरसागर यांनी न्यायालयीन काम पाहले.
