अकोट ग्रामीण व अकोट शहर यांच्या संयुक्त कार्यवाहीतुन २७ गोवंशाना जिवदान एकुण अंदाजे २०,०००,००/रू मुददेमाल जप्त... आरोपी अटकेत...


अकोट ग्रामीण व अकोट शहर यांच्या संयुक्त कार्यवाहीतुन २७ गोवंशाना जिवदान एकुण अंदाजे २०,०००,००/रू मुददेमाल जप्त... आरोपी अटकेत...
..

प्रशांत भोपळे/हिवरखेड...

दि.०२/१०/२०२४ रोजी अकोट ग्रामीण पोलीसांना माहीती मिळाली की, पोपटखेड गेटवरून एक आयशर हा भरधाव वेगाने व बेदकारपणे वाहन येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलीस अधिक्षक  अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमथुन दोन टिम तयार करून तात्काळ मिळालेल्या माहिती प्रमाणे पाठविले असता. पोलीसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व लापरवाही ने हिवरखेड रोडवर जातांना दिसला. पोलीसांच्या टिमचे त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असुन आयशर चालक हा लापरवाही ने वाहन चालवुन पोलीसांच्या अंगावरून आयशर ट्रकने कट मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी जीवांवी बाजी लावुन सदरचे वाहन अडगाव खु ता. अकोट येथे थांबविले असता. त्यामध्ये एकुण २७ गोवंश दिसले. दोन आरोपीतांना ताब्यात घेतले असुन आयशर वाहनासह एकुण २७ गोवंश किं अंदाजे २०,०००,००रू चा मुददेमाल प्राप्त असुन सदरचे आरोपी हे सरहानपुर जिल्हयाचे (उत्तरप्रदेश) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्टांचे मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधिक्षक,अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखालसहा. पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, एपीआय योगीता ठाकरे, पीएसआय शेख, एएसआय लिखार, पोहेकों सोळंके, पोहेकॉ सोनवणे, पोहेकॉ तोमर, पोहेकॉ वासुदेव ठोसरे, पोकॉ गोपाल जाधव, पोकों वामन मिसाळ, पोकाँ शैलेश जाधव, पोकाँ रितेश जायभाय, पोकॉ अमोल यांनी केली.

Previous Post Next Post