राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रायपुर या गावातील रहिवासी सोनू बेठेकर (Gold Medalist) येत्या 12 ऑक्टोंबर 2024 पासून होणाऱ्या 36 वा आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स चॅम्पियनशिप खुला वरिष्ठ गटातून निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या आधारे यांची निवड करण्यात आली. ते विविध क्रीडा प्रकारांमध्ये 110 मीटर अडथळा,3K.M walk Run, लाँग जंप, मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांनी या अगोदर साऊथ कोरिया, दुबई नंतर मलेशिया तिसऱ्यांदा या देशात भारताचे प्रतिनिधित्व करणार असुन मेळघाटातील राजनेता तसेच सर्व गावकरी मंडळी, ग्रामपंचायत कर्मचारी मा. सरपंच साहेब, ग्रामसेवक . तलाठी साहेब जि. प शाळा रायपूर तील कर्मचारी, शासकीय आश्रम शाळा येथील कर्मचारी . वनविभाग कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व मिळून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहेत आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिले. सोनू बेठेकर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल पंच, व्हॉलीबॉल प्रशिक्षक, उत्कृष्ट धावपटू सुद्धा आहेत.तसेच सोनु बेठेकर यांना RC 24 News टिप तर्फ विशेष शुभेच्छा दिल्या गेल्या आहे.
