धारणी व चिखलदरा तालुक्यातील पेसा मोबिलायझर यांचा मानधन दहा महिन्यापासून नाही...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी व चिखलदरा तालुक्यातील पेसा अर्तगत शासनाच्या gr नुसार २०१७ साली संप्टेबर महीण्यात जवळपास १०७ ग्रामसभा पेसा मोबिलाझरची यांची नियुक्ती ग्रामपंचायत गावातील बचत गटा मार्फत करण्यात आली आहे. २०१७ पासुन ते २०२३ पर्यंत या पेसा मोबिलायझरचे मानधन वेळेवर झाले. परंतु २०२४ जानेवारी महिन्यात पासून या पेसा मोबिलाझरचे कामाचे अहवाल वेळेवर जात असुन आज दहा महिने झाले या लोकांचे मानधन आज पर्यंत झाले नाहीत यांला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .तसेच धारणी व चिखलदरा तालुक्यातील सर्व पेसा मोबिलाझर हे त्यांच्या कामात परिपूर्ण शक्षम असुन तसेच सरपंच व सचिव साहेबाच्या आलेल्या आदेनुसार हे काम करीत असतात तरीही काही अधिका-या च्या हलगर्जीपणा मुळे धारणी व चिखलदरा येथिल पेसा मोबिलायझर यांची उपवास मरण्याची वेळ आली असल्याचे समजले जात आहे. बोलल्या जात आहे की येणा-या दि १४/१०/२०२४ ला येथिल पेसा मोबिलाझर तालुका पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर व मुंबई पातळी पर्यंत हे त्यांच्या मानधन बाबतीत निवेदन देणार आहे .
