दहेंद्री ग्रामपंचायत मध्ये कामे सुरळीत असुनही ग्रामपंचायतिला कुलुप लावण्यात आले होते...
राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री या गावातील नागरिकांनी दि ३०/९/२०२४ ला ग्रामपंचायत ला गावात बरोबर पाणी मिळत नाही म्हणून येथिल महिला नागरीकांनी दहेंद्री ग्रामपंचायतीला कुलुप लावले होते. परंतु सविस्तर माहिती नुसार या गावातील वाटरसप्लायची पाईप लाईन दि. २४/९/२०२४ ला काही ठिकाणच्या जागी फुटले असल्याने त्याच दिवशी सरपंच यांनी पाईप लाईन दुरुस्ती करण्यासाठी दोन मजुर कामावर लावले होते. परंतु वाटरसप्लायचा मेन पाईप फुटल्या असल्याने येथिल मजुर वर्ग यांना दुरुस्ती करणे जमले नसल्यामुळे सरपंच यांनी अमरावती चे कारागीर पाईप लाईन दुरुस्ती करण्या करीता बोलावले असता ही पाईप लाईनचे कामे दि १/१०/२०२४ ला पुर्ण करण्यात आले आहे.तसेच दहेंद्री गावातील एका व्यक्तीचे घर वाटरसप्यायच्या मेन पाईप लाईन वर बाधलले असल्याचे समजले जात आहे. तसेच वाटर सप्यालय पाईप लाईन ज्या दिवशी फुटली होती त्या दिवशी सरपंच रवि बेठेकर यांनी गावातील नागरिकांना सागितले होते की वाटर सप्यायची मेन लाईन फुटल्या मुळे दोन ते तिन दिवस पाणि येणार नाही. तरीही गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत ला कुलुप लावले होते. याला काय समजावे असा मोठा प्रश्न उपस्थित निर्माण होतो.
